ग्रामस्वराज अभियानासाठी सात गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:49 PM2018-04-16T22:49:52+5:302018-04-16T22:50:12+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.

Selection of seven villages for grassroots campaign | ग्रामस्वराज अभियानासाठी सात गावांची निवड

ग्रामस्वराज अभियानासाठी सात गावांची निवड

Next
ठळक मुद्देसबका साथ-सबका ग्राम-सबका विकास : २०१२ पर्यंत विविध योजना राबविणार

देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त २१ एप्रिलपर्यत ‘ग्रामस्वराज अभियान’ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील सात गावांची विशेष निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजना प्राधान्याने आणि प्रकर्षाने राबविण्यात येणार आहेत.
‘ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत या गावांमध्ये १४ ते २१ एप्रिल या सप्ताहादरम्यान 'सबका साथ सबका ग्राम सबका विकास' या धर्तीवर प्रधानमंत्री उज्वला योजना, सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांची विशेष अंमलबजावणी कटाक्षाने राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कालावधीत सामाजिक न्याय दिवस म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
त्याचबरोबर आयुष्यमान भारत दिवस, किसान कल्याण दिवस, अजीवीका दिवसही साजरे करण्यात येणार आहेत.
याशिवाय स्वच्छ भारत दिवस, श्रमदान, शौचालय बांधणे व ते वापरणेबाबत जनजागृती रॅली, राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा करणे, विशेष ग्रामसभा आयोजित करणे, आरोग्य तपासणी, लसीकरण, स्त्री बळकटीकरण सामाजिक विकास आदी बाबतीचे चर्चासत्र आयोजित करणे बालपंचायत आयोजित करून त्यात रांगोळी, चित्रकला, हस्तकला, याबाबत निबंध वक्तृत्व स्पर्धा घेणे, शासकीय विषयांवरील चर्चासत्र व पथनाट्य आयोजित करणे त्याचबरोबर स्वयंसहायता महिला बचत गट, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजनेचे लाभार्थी, शासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, बँकर्स, सामाजिक संस्था, यांनाही सामावून घेवून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
निवड करण्यात आलेली गावे
'ग्रामस्वराज अभियान' अंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सात गावांमध्ये अशोकनगर, सावरी, टेकेपार, गोलेवाडी, जांभळी, मासलमेटा, कान्हळगाव (सोमनाळा) गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये २१ एप्रिलपर्यत विविध योजना राबविणार येत आहेत.

Web Title: Selection of seven villages for grassroots campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.