विदर्भ राज्य निर्मितीसाठी आत्मक्लेश उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 09:34 PM2018-10-03T21:34:37+5:302018-10-03T21:34:56+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडाराच्या वतीने म़हात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी २ आॅक्टोबरला सकाळी ९ ते ५ वाजतापर्यंत त्रिमुर्ती चौकात समितीचे जिल्हाध्यक्ष देविदास लांजेवार यांच्या नेतृत्वात एकदिवशीय सामुहिक आत्मक्लेश उपोषण करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडाराच्या वतीने म़हात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी २ आॅक्टोबरला सकाळी ९ ते ५ वाजतापर्यंत त्रिमुर्ती चौकात समितीचे जिल्हाध्यक्ष देविदास लांजेवार यांच्या नेतृत्वात एकदिवशीय सामुहिक आत्मक्लेश उपोषण करण्यात आले़
राष्ट्रपिता म़हात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरूवात करण्यात आली.़ यावेळी उपाध्यक्ष यशवंत बिरे, जाधवराव साठवणे, भाऊराव बन्सोड, डॉ़ तुरस्कर, सेलोकर, नेपालचंद पाटील, रामप्रसाद आकरे, कृष्णा कुणेवार, विवेक नखाते, अरविंद लांजेवार, अशोक वघरे, अनिल भुरे, कोअर कमेटी सदस्य भगवान झंझाड यांनी मार्गदर्शन केले़ संचालन जाधवराव साठवणे यांनी तर उपस्थितांचे आभार अरविंद लांजेवार यांनी मानले़
उपोषणाला प्रेमलाल लांजेवार, एजाज खान, भाऊराव बन्सोड, तेजराम बहेकार, लक्षपाल केवट, न्याहालचंद पाटील, वसंताजी चोपकर, भाऊराव पाटेकर, महादेव जांगडे, तेजेंद्र अमृतकर, दिनेश भुरे, मधुकर बांगडकर, प्रेमसागर वैरागडे, निकेश साकुरे, शंकरराव चांदेवार, गोपाल झेलकर संजय वाघमारे, रामू शहारे, राकेश चेटूले, सरपंच मोरेश्वर गजभिये, विवेक नखाते, सुरेंद्र सेलोकर, डॉ़ नितीन तुरस्कर, रामप्रसाद आकरे, विकास पाटेकर, अशोक वघरे, राजेश सार्वेद्व भरत बुरडे, डॉ़ महादेव महाजन, मुकूंदा पांढरीपांडे, तुळशीराम गेडाम उपस्थित होते़ यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले़
लाखांदूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहेत. मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने लाखांदूर येथील शिवाजी चौक येथे २ आॅक्टोबरला सकाळी १० ते ४ पर्यंत आत्मक्लेस आंदोलन करण्यात आले. उपोषण सोडून तहसीलदार यांना उपस्थित शिष्टमंडळाने प्रधानमंत्री यांना त्वरित विदर्भ राज्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
केंद्र सरकार व राज्य सरकारने निवडणूक होण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ म्हणून लिखित आश्वासन दिले होते. मात्र सरकारचे विदर्भ देण्याची मानसिकता नाही म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अनेक आंदोलने केलीत. मात्र केंद्र सरकारला जाग येत नाही.
त्यामुळे विदर्भ राज्य समितीच्या वतीने २ आॅक्टोबरला विदभार्तील सर्वच तालुका ठिकाणी केंद्र सरकारला इशारा म्हणून त्वरित विदर्भ द्या, या मागणीला घेऊन येथील शिवाजी चौक येथे सामूहिक (आत्मक्लेस) उपोषण आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपोषण स्थळी कोर कमिटी सदस्य मोरेश्वर बोरकर, तालुका अध्यक्ष विश्वपाल हजारे, युवा अध्यक्ष शिलमंजू शिव्हगडे, चंद्रशेखर खेडीकर, अॅड.मोहन राऊत, मानबिंदू दहिवले, रामचंद्र तरोने, जिल्हा उपाध्यक्ष मनोज बनसोड, विनोद ढोरे, जितेंद्र ढोरे, स्वप्नील ठेंगरी मंगला बागमरे, प्रकाश देशपांडे, रमेश राऊत, हरिदास खोब्रागडे, विकास बुरडे, चांद्रमानी गायकवाड, डाकराम गायकवाड, प्रशांत मशके, शाहरुख पठाण, अमोल नागदेवे, आशिष गजभिये, सौरभ वैध्ये, यांच्या उपस्तीतमध्ये आंदोलन करण्यात आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आंदोलनाचा समारोप तहसील कार्यालयात जावून तहसीलदार यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदनातून तात्काळ स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला.