कर्कापुरात सिमेंट प्लग बंधाऱ्याचे अर्धवट बांधकाम
By admin | Published: April 23, 2015 12:15 AM2015-04-23T00:15:18+5:302015-04-23T00:15:18+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाचा सोयीसाठी कर्कापुरात गेल्या वर्षापासून सिमेंट प्लग बंधाऱ्याचे बांधकाम होत असताना,
‘त्या’ कंत्राटदाराचा पोबारा : बंधाऱ्याचे निकृष्ठ बांधकाम
चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांना सिंचनाचा सोयीसाठी कर्कापुरात गेल्या वर्षापासून सिमेंट प्लग बंधाऱ्याचे बांधकाम होत असताना, आज घडीला पुर्ण झाले नाही. बांधकाम बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार असून चौकशी तथा कारवाईची मागणी होत आहे.
लघु पाटबंधारे विभाग राज्य अंतर्गत कर्कापुर गावात ५४ लाख खर्चाचा सिमेंट प्लग बंधारा सन २०१४ मध्ये मंजुर करण्यात आलेला आहे. या बंधारा बांधकामाचे कंत्राट गोंदिया जिल्हयातील कृणाल रामटेके नामक इसमांना देण्यात आले आहे. महत्वाकांक्षी बंधारा बांधकामास मंजुरी देताना गट नं. १४२/१ या जागेचा आधार घेण्यात आलेला आहे. पंरतु प्रत्यक्षात बंधाऱ्याचे बांधकाम गट नं. १४२/२ मध्ये करण्यात येत आहे. या गटात जनजिवनराम मिश्रा यांची शेती आहे. नियमबाहय या शेतीत बंधाऱ्याचे बांधकाम होत असल्याने शेतकरी त्रस्त झाली आहे. गेल्या वर्षापासून या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे.
परंतु आजवर बांधकाम पुर्ण झाला नाही. या शिवाय बंधारा बांधकामात शेत जमीन गिळंकृत झाली असताना अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या शेतकऱ्याने संबंधीत विभागात अनेक निवेदन दिली आहेत. परंतु या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. कुणी वरिष्ठ अधिकारी मदतीकरिता माहिती देत नाही.
या विभागाचे उपविभागीय कार्यालय तुमसरात आहे. या कार्यालयात शेतकऱ्याचे गाऱ्हाणे तथा अडचणी निकाली काढणारे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नाही. दरम्यान बंधारा बांधकामाने तिन शाखा अभियंता अनुभवली आहेत. हे अभियंता एकमेकांकडे फक्त बोट दाखवित आहेत. या परिसरात होणारे बंधाऱ्याचे बांधकाम गोंदिया जिल्हयातील कंत्राटदारांना देण्यात आली आहे. राज्यस्तरीय लघु पाटबंधारे विभागाचा कार्यालय गोंदिया जिल्हयातील कंत्राटदारांना लॉटरीची भुमिका बजावत आहे. दरम्यान बंधारा बांधकामात आलबेल असल्याचा कारणावरुन शाखा अभियंता माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
बंधारा बांधकामात मोठी तफावत आहे. लोखंड आणि गिट्टी, सिमेंट चा अल्प प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. बंधाऱ्याचे लोखंडी सलाख सैरबैर आहे. तर गिट्टी पूर्णत: निघाली आहे. शेत शिवारात या बंधारामुळे पावसाळ्यात पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. या विभागाचे शाखा अभियंता एम. आर. गजबे यांना अधिक माहितीसाठी संपर्क साधले असता होवू शकला नाही. (वार्ताहर)
बंधारा बांधकामात गैरव्यवहार करण्यात आला असून निकृष्ट बांधकामामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. दोषी कंत्राटदार आणि शाखा अभियंता यांचेवर कारवाई करिता आपण रास्ता रोकों आंदोलन करणार आहोत.
- सुकलाल सिंदपुरे
सरपंच कर्कापुर