ज्येष्ठ नागरिक समाजाचा आरसा

By admin | Published: November 1, 2016 12:37 AM2016-11-01T00:37:44+5:302016-11-01T00:37:44+5:30

वृद्धत्वाला समाजात होणारा नकार व तिरस्कार स्वत:ला नाकारण्यासारखा आहे.

Senior Citizen Community Mirror | ज्येष्ठ नागरिक समाजाचा आरसा

ज्येष्ठ नागरिक समाजाचा आरसा

Next

मिरासे यांचे प्रतिपादन : वरठीत ज्येष्ठांचा सत्कार
वरठी : वृद्धत्वाला समाजात होणारा नकार व तिरस्कार स्वत:ला नाकारण्यासारखा आहे. जेष्ठ नागरीक स्व:ताच्या अनुभवाने भविष्याचे वेध घेणारे यंत्र आहे. समाजाला दिशा दाखवून भविष्याचे खरे स्वरुप दाखवणारे आरशाप्रमाणे त्यांचे कार्य आहे. सुख आणि दु:ख यांचे समतोल ठेवून मानवी सृष्टीला साभांळून भविष्यातील नुकसान त्यांच्याकडून सहज लक्षात येवू शकते. जेष्ठ नागरिक म्हणजे कुटुंबातील स्वच्छ प्रतिमेचे प्रामाणिक आरसा आहे, असे प्रतिपादन सरपंच संजय मिरासे यांनी केले.
जेष्ठ नागरीक संघ वरठी तर्फे जेष्ठांचा अमृत महोत्सवी सत्कार नुकताच वरठी येथे घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
उद्घाटन सरपंच संजय मिरासे यांचे हस्ते व जिल्हा परिषद सदस्य धर्मशिला उके यांच्या अध्यक्षेत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समीती अध्यक्ष मिलींद धारगावे, पंचायत समीती सदस्य पुष्पा भुरे, उमेश घमे, प्राचार्य तथागत मेश्राम व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके व जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष व माजी प्राचार्य श्रावण मते उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नागरीक संघाचे दीवगंत सदस्य स्व.बाबुराव साठवणे, मनोहर दुम्पवार व कवळु ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जि. प. सदस्य धर्मशिला उके, सरपंच संजय मिरासे, पंचायत समीती सदस्य पुष्पा भुरे, त.मु.स. अध्यक्ष मिलींद धारगावे व दिलीप उके यांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ नागरीक संघाचे वरिष्ठ सदस्य ताराचंद बोरकर, बाबुराव चोपकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचलन विष्णुपंत चोपकर, प्रास्तावीक श्रावण मते व आभार रविकुमार डेकाटे यांनी मानले. कार्यक्रमास संघाचे सचिव देविदास डोंगरे, हरीभाऊ भाजीपाले, बाबुराव डोंगरे, श्रावण डोकरीमारे, कविता वरठे, लिला चोपकर, रमेश रामटेके, शामराव रामटेके, महादेव बन्सोड, हीतेद्र नागदेवे, नरेद्र निमजे, गिता गायधने, सतिबाई मेश्राम उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Senior Citizen Community Mirror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.