महिला सरपंचाच्या आत्महत्येने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:19+5:302021-01-03T04:35:19+5:30
भंडारा तालुक्यात राजकीय केंद्रबिंदू ठरणारी ठाणा ग्रामपंचायत येथे सरपंचासह १६ सदस्य आहेत. येथील लोकसंख्या नऊ हजारांच्या घरात आहे. सरपंच ...
भंडारा तालुक्यात राजकीय केंद्रबिंदू ठरणारी ठाणा ग्रामपंचायत येथे सरपंचासह १६ सदस्य आहेत. येथील लोकसंख्या नऊ हजारांच्या घरात आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून दिले आहे. सरपंच म्हणून सुषमा पवार निवडून आल्या. तीन वर्षाचा कार्यकाळ लोटला. दरम्यान मंगळवार २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता मासिक सभा घेण्यात आली. यात १३ सदस्य उपस्थित होते. विषय सूचीनुसार चर्चा करण्यात आली. कचरा गाडी अर्थात घंटागाडी खरेदी विषयक चर्चा सभेत रंगली. खरेदी केलेल्या वस्तूची पावती उपस्थित सदस्यांनी दाखविण्याचे विनंती सरपंच सुषमा पवार यांना केली. दरम्यान सरपंच यांनी पंख्याला गळफास लावून जीव देईल, असे बोलले असता उपस्थित सदस्यांनी एकसुराने येथे न करता बाहेर जाऊन काय करायचे ते करा, असे गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी जवाहरनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. दरम्यान सभागृहाच्या मागील दार उघडून ४ वाजता तलावाच्या पाळीकडे पोहोचली असता उपस्थित सदस्य प्रशांत ढोमणे व इतर महिला सदस्यांनी मनधरणी करून सरपंचाला सभागृहात चर्चेत सहभागी केले. उच्चशिक्षित सरपंच यांची कृती पाहून पुढे कमीजास्त झाल्यास आपला बचावात्मक पवित्रा समजून उपसरपंच अरविंद तिरपुडे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र किंदर्ले, निकेतन चवरे,जयश्री काटेखाये, रुपलता भागवत, प्रमिला मेश्राम , राहुल साखरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
मंगळवार, २९ डिसेंबरच्या मासिक सभेत मी गमतीने तसे बोलले. तसा काही प्रकार केलेल्या नाही. नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न सदस्य करीत आहे. गावाचा विकास खुंटविण्याचा डाव आहे.
सुषमा पवार, सरपंच
ग्रामपंचायत ठाणा मासिक सभा सुरु असताना सभाध्यक्ष सुषमा पवार यांनी सदर उद्गार काढले . पण तसे काही केले नाही.
एच. डी . सतदेवे, ग्रामविकास अधिकारी
सरपंच यांनी बोललेल्या प्रकाराने सभागृहाबाहेर गेलेल्या सरपंचांची मनधरणी करून महिला सदस्य सोबत सभागृहात आणले .
प्रशांत ढोमणे, सदस्य,