ओव्हरलोडचा भुर्दंड रेतीघाट कंत्राटदारावर बसवा
By admin | Published: June 10, 2015 12:34 AM2015-06-10T00:34:10+5:302015-06-10T00:34:10+5:30
रेतीघाटातून वाळूची वाहतूक करताना ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन मालक आणि चालकांवर कारवाई केल्या जाते.
निवेदन : वाहनचालक मालक समितीची मागणी
भंडारा : रेतीघाटातून वाळूची वाहतूक करताना ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन मालक आणि चालकांवर कारवाई केल्या जाते. रेतीघाटाच्या कंत्राटदारार कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक मालक संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
लिलाव झालेल्या जिल्ह्यातील रेतीघाटांमध्ये वाळूचा उपसा केल्यानंतर ट्रक अथवा ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक केल्या जाते. मात्र रेतीघाटावर धर्मकाटा बसल्याने वाळूचे वजन करता येत नाही. परिणामी प्रत्येक घाटावर धर्मकाटा लावण्यात यावा, ओव्हरलोडचा भुर्दंड रेतीघाट मालकांवर लादावा, १० चाकी ट्रकमधून वाहतूक करण्यासाठी ३.५ ब्रासची रॉयल्टी द्यावी, रेतीची अवैध वाहतूक थांबविण्यासाठी निर्धारित ठिकाणी तपासणी नाका लावण्यात यावा, रस्त्यात मध्येच वाहन थांबवू नये, घाटातूनच क्षमतेपेक्षा अधिक रेतीचा भरणा करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच घाटातून ओव्हरलोट निघणाऱ्या वाहनांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात रेतीघाट सुमारे चार महिने बंद असतात. परिणामी रेतीची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकांकडे वाहनेही या काळात धावत नाही. दुसरीकडे विविध प्रकारचे बांधकाम वर्षभर सुरू राहत असल्याने रेतीची गरज भासते. अशाच स्थितीत व्यापारी आणि व्यावसायीकांना रेतीची साठवणूक करण्याची परवानगी देण्याची मागणी समितीने केली आहे. यावेळी शिष्टमंडळात शिवा गायधने, शेखर साकुरे, पप्पु भोपे, राजू काळे, रोशन व्यवहारे, देवा गायधने, सुरेंद्र बुधे, राजेश वैरागडे, विलास मोहतुरे, सुनिल रहाटे आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)