नदीकाठावरील गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:01:14+5:30

तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे. परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठणठणाट आहे.

Severe water scarcity in riverside villages | नदीकाठावरील गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई

नदीकाठावरील गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई

Next
ठळक मुद्देविहीर, तलावांनी गाठले तळ : १५ गावात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : उन्हाची दाहकता वाढल्याने जलस्तर खोलात गेला तालुक्यातील विहिरी तलाव पूर्णत: आटले व बोरवेल सुद्धा बंद पडल्याने विशेषत: नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच त्याच बरोबर शेतक?्यांची उन्हाळी पीके मरणासन्न अवस्थेत आली आहेत परिणामी तात्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे
तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे. परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंडया वारपिंडकेपार, महालगाव या गावामध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे
निर्सगावर अवलंबून असलेल्या साधन सामुग्री चा वापर करून येथील शेतकरी आपल्या शेतात हंगामी पिकांचे उत्पादन घेतात मात्र गत पावसाळ्यात पडलेला अत्य अल्प पाऊस व उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरी तलाव तळ गाठत आहे.
त्यावर शेती फिडर च्या भारनियमन मुळे शेतकºयांचा उभ्या पिकांना फटका बसला आहे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकºयांनी परत कर्जबाजारी होऊन नव्या उमेद ने उन्हाळी हंगामात ऊस व धानपिक शेतात लावले.
परंतु विहारी, तलाव बोअरवेल आटल्याने त्या उभ्या पिकांना कसे वाचविता येईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. बावनथडी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा आहे त्या पाण्याचा नदीपात्रात निचरा झाल्यास जलस्तर वाढून विहिरी ना पाणी येईल व पिकांना जीवनदान मिळेल. मात्र शेतकºयांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातून पाणी शेतकºयांना मिळत नसेल व पाण्या अभावी शेतकºयांचे उभे पीक मरत असतील तर त्या प्रकल्पाचा फायदा तरी काय असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांनी पीक कसे बसे वाचविले. मात्र समस्या बिकट झाल्याने आमदार राजू कारेमोरे यांना अवगत करण्यात आले. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी यांना बावनथडीचे पाणी सोडण्याकरिता लेखी पत्र दिले आहे. परंतु अद्याप पाणी सोडण्यात आले नाही.
-ठाकचंद मुंगूसमारे,
तालुका अध्यक्ष, रायुका तुमसर

Web Title: Severe water scarcity in riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.