साखरा येथे भीषण पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:56+5:302021-05-17T04:33:56+5:30
गावात एकूण सात हातपंप आणि एक सार्वजनिक विहीर असून यापैकी हेमराज राऊत ,नीलकंठ भांडारकर, हरीचंद ईश्वरकर यांचे घराशेजारील तीनही ...
गावात एकूण सात हातपंप आणि एक सार्वजनिक विहीर असून यापैकी हेमराज राऊत ,नीलकंठ भांडारकर, हरीचंद ईश्वरकर यांचे घराशेजारील तीनही हातपंप गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त असून सार्वजनिक विहीरसुद्धा कोरडी असल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शेतावरील पंपावरून पाणी आणावे लागत आहे. याशिवाय मंदिराच्या पाठीमागील पाईपलाईन बंद पडलेली असल्याने या परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून नादुरुस्त पाईपलाईन आणि हातपंप लवकरात लवकर दुरुस्त करावे आणि पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी साखराच्या ग्रामस्थांनी केली आहे.
कोट
नळयोजना आणि हातपंप दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतला पुरेसा निधी उपलब्ध नाही. तसेच ग्रामस्थ नळांच्या तोट्या काढून टाकतात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. सर्वांना समान पाणी मिळण्यास अडचण निर्माण होत आहेत. गीताबाई बांगरे, सरपंच, साखरा.