तावशी येथे भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:50+5:302021-05-14T04:34:50+5:30
तावशी गावची लोकसंख्या जवळपास दोन हजार आहे. गावात ग्रामपंचायतीमार्फत नळयोजना चालविली जात आहे. गावातील अनेकांनी नळ कनेक्शन घेतले आहे. ...
तावशी गावची लोकसंख्या जवळपास दोन हजार आहे. गावात ग्रामपंचायतीमार्फत नळयोजना चालविली जात आहे. गावातील अनेकांनी नळ कनेक्शन घेतले आहे. दोन बोअरवेलद्वारा पाण्याचा पुरवठा गावकऱ्यांना केला जातो. मात्र, काही दिवसांपासून बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. बोअरवेल दुरुस्त होईपर्यंत दुसरा उपाय करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गावातील काही नागरिक टिल्लु पंपाच्या सहायाने पाणी पळवित असल्याने इतरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची माहिती आहे. या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
बॉक्स
शुद्ध पाण्याची समस्या कायम
लाखांदूर तालुक्यात ६१ ग्रामपंचायती आहेत. त्यातील अनेक गावांत पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, याकडे संबंधित लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील बोअरवेलमध्ये बिघाड झाल्यास बोअरवेल दुरुस्ती करणारे तीन तंत्रज्ञ आहेत. त्यातील एक आजारी असल्याने संपूर्ण तालुक्याची जबाबदारी दोन तंत्रज्ञांवर आली आहे.