सोमनाळा येथे सिमेंट रस्त्यावर सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:29+5:302021-09-02T05:16:29+5:30
सोमनाळा तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे सर्व गावात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम केले आहे. नेहरू वॉर्डमध्ये असलेल्या सिमेंट रोडवर ...
सोमनाळा तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे सर्व गावात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम केले आहे. नेहरू वॉर्डमध्ये असलेल्या सिमेंट रोडवर नाली बांधकाम आहे. आजुबाजूच्या लोकांनी नाली बुजविली आहे. त्यामुळे जनावरांचे मल-मूत्र सिमेंट रोडवर येते. त्यामुळे रोडवर सतत दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचलेले असते. यामुळे आजुबाजूला नेहमी दुर्गंधी येत आहे. रोडवर सांडपाणी असल्याने डास व कीटकजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सांडपाण्यामध्ये पावसाच्या पाण्याची भर पडत असल्याने रोडवर दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. त्यामुळे आजुबाजूच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंबंधात ग्रामपंचायत सरपंच, खंडविकास अधिकारी यांना निवेदन देऊन सांडपाण्याची व्यवस्था लावण्याची मागणी नेहरू वॉर्डातील महिला उर्मिला वैद्य, नीशा वैद्य, मनीषा जांभूळकर, शीतल जांभूळकर, किशोर वैद्य, विनोद वंजारी, राजेश वैद्य व गावकऱ्यांनी केली आहे.
कोट
नाली उपसण्यात येऊन पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत नाली बुजविणाऱ्या नागरिकांना पत्र देण्यात येईल.
- महेंद्र वैद्य, सरपंच, सोमनाळा
010921\1540-img-20210901-wa0001.jpg
फोटो सोमनाळा (बु) येथिल नेहरू वार्डातील सिमेंट रोडवर असे सांडपाणी साचते