शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठ्याचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:31 AM2019-05-16T00:31:21+5:302019-05-16T00:31:45+5:30
सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळख्यात येथील दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याने शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे.
प्रल्हाद हुमणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळख्यात येथील दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याने शुध्द पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग भंडारा अंतर्गत शहापुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाद्वारे बेला, भोजापूर, उमरी-फुलमोगरा, शहापुर, गोपीवाडा, परसोडी, ठाणा येथील गावांना बेला येथील जलशुध्दीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा सुमारे बाराशे नळ धारकांना केला जातो. ही पाणीपुरवठा योजना पुर्वी म्हणजे चारवर्षापुर्वी जिल्हा परिषद भंडाराकडे देखभाल दुरुस्तीचे कामे होती.
यावेळी सोळा ते सतरा लाख रुपये वार्षिक खर्च हिशेब होता. आता बेला ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरुस्तीचे कामे दिली. तेही फक्त तेरा ते चौदा लाख रुपयाचा. या तफावतीचे नेमके कोणते कारण अद्याप गुलदस्त्यात दडलेले आहे. दुसरी बाब म्हणजे बाब अत्यंत जिव्हाळ्याचा दैनिक गरजेचा विषय. मात्र मागील पंधरा दिवसापासून शहापूर येथील राष्टÑीय महामार्ग दरम्यान मुख्य जलवाहिनी नादुरुस्त अवस्थेत तसीच जिल्हाधिकारी यांच्या दालनात आचारसंहितेमुळे पडून आहे.
यामुळे परसोडी, ठाणा येथील अडीचशे नळधारकांना शुध्द पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे. याउलट ठाणा येथील दिड कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना १० वर्षापासुन रेंगाळत पडलेली आहे. जवळपास पुर्ण पैसे खर्च झाले. मात्र ठाणा वासीयांना एक थेंब पाण्याचा मिळालेला नाही. यात ग्रामस्थांनी झालेल्या खर्चात अफरातफरचा ठपका ठेऊन संबंधी यंत्रणेला दोषी माणून त्यांच्याविरुध्द एकमुखी न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचा ठराव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आला आहे.
यालाही आम्हाला न्यायालयात जनहित याचीका दाखल करण्याचा ठराव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आले. यालाही आम्हाला न्यायालयात जाण्याच्या व जनहित याचीका दाखल करण्याचा अधिकार नाही असे ग्रामपंचायत व पंचायत समिती विभाग म्हणतात. असे मागील आठवड्याच्या तहकुब ग्रामसभेत उपस्थित जनतेला सांगण्यात आले. मात्र लेखी पुरावा देण्यात आलेला नाही. येथे मात्र घोडे कुठतरी भिझतय.
संपूर्ण याउलट दिड कोटीची पाणीपुरवठा योजनाचे पाईप लाईन निकामी झाले, यामुळे यंत्रणा पाणीपुरवठा करु शकत नाही. अशी सारवा सारव करीत ग्रामसभेत नवीन विद्यमान ग्रामपंचायत कमेटी व पाणीपुरवठा समितीने ग्रामस्थासमोर प्रस्ताव ठेवला. याला विरोध जनतेनी केले. याकडे आता कोण मायबाप उरलेला आहे की जो ठाणा पाणीपुरवठा योजना तळीस नेणार याचा शोध घेणे आज सर्व गावकऱ्यांकडे प्रश्न पडलेला आहे. जिल्ह्याचे मुख्य याकडे जातीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.