शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:45 PM2018-06-26T22:45:07+5:302018-06-26T22:45:26+5:30
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दलित, मागासवगीर्यांच्या उत्थानासाठी सदैव कार्य केले. आरक्षणाची गरज त्याकाळात ओळखून त्यांनी आरक्षण लागू केले. महाराजांनी केवळ समाजसुधारकच नाही तर अन्य क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. शाहू महाराजांचे कार्य आजही अनुकरणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडण घडणीत राजर्षी शाहू महाराजांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दलित, मागासवगीर्यांच्या उत्थानासाठी सदैव कार्य केले. आरक्षणाची गरज त्याकाळात ओळखून त्यांनी आरक्षण लागू केले. महाराजांनी केवळ समाजसुधारकच नाही तर अन्य क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. शाहू महाराजांचे कार्य आजही अनुकरणीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडण घडणीत राजर्षी शाहू महाराजांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस २६ जनू हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षीय उदघाटनपर भाषणात खा. कुकडे बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे होते तर ा्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, कावेरी नाखले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, डॉ. रविंद्र वानखेडे, बाळा गभण उपस्थित होते. जातपात, धर्म, वंश विसरुन समाज संघटित राहीला पाहिजे तर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आपणास घेता येईल. हाच खरा सामाजिक न्यायाचा उद्देश आहे असे खासदार कुकडे म्हणाले. आपण कुठल्याही जाती पंथाचे नसून सर्व प्रथम भारतीय आहोत, अशी भावना जागृत झाली पाहीजे. त्यासाठी समाज उत्थानाचे कार्य करा, असेही ते म्हणाले.
सामाजिक समतेचे जनक, सर्व प्रथम आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित करणारे महापुरुष म्हणजे राज्यर्षी छत्रपती शाहू महाराज, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे म्हणाले.
अमृत बन्सोड म्हणाले, सामाजिक न्यायाची संकल्पना महात्मा फुले यांनी मांडली. त्यास मूर्तरुप राजर्षी शाहू महाराजांनी दिले. सर्व प्रथम आपल्या संस्थानात विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहाची स्थापना शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत झाली. मागासवगीर्यांना ५० टक्के आरक्षण आपल्या संस्थानात लागू केले. अस्पृश्यता नष्ट करुन समता प्रस्थापित केली, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. रविंद्र वानखेडे, बाळा गभणे यांची भाषणे झाली.
सामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्हयातील दादासाहेब गायकवाड पुरस्कार प्राप्त मिरा भट, समाज भूषण पुरस्कार प्राप्त विनोद मेश्राम, दलित मित्र अमृत बन्सोड, ज्ञानेश्वर खंडारे, इश्वर सोनवाने, बाळकृष्ण शेंडे व ब्ल्यु डायमंड सोशल वेल्फेअर इंस्टीटयुट, मोहाडी या समाजभूषण प्राप्त संस्थेचा सत्कार करण्यात आला. शासकीय वसतीगृहातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप अतिथींच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी तर आभार मुख्याध्यापक मेंढे यांनी मानले. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी समता दिंडीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी सहाय्यक आयुक्त आशा कवाडे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते उपस्थित होते. ही दिंडी शिवाजी स्टेडियमपासून निघून सामाजिक न्याय भवनात समारोप झाला.