शील समाधी प्रज्ञा हे कल्याणकारी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:39 AM2021-09-22T04:39:30+5:302021-09-22T04:39:30+5:30
२१ लोक १८ के जवाहरनगर : सुरुवातीची, मध्ये आणि शेवटची ही जे कल्याणकारी आहेत. असा कोणता धर्मात आहेत ...
२१ लोक १८ के
जवाहरनगर : सुरुवातीची, मध्ये आणि शेवटची ही जे कल्याणकारी आहेत. असा कोणता धर्मात आहेत तो सुरुवातीला कल्याणकारी आहे. अशी कोणती शिकवण आहे, की ती मध्य मध्ये कल्याणकारी आहे. अशी कोणती देशना आहे, ती शेवटची कल्याणकारी आहे. शीलचे पालन करणे ही सुरुवातीची कल्याणकारी, समाधीच्या ध्यान ही मध्येचे कल्याणकारी आहे. प्रज्ञा ही शेवटचे कल्याणकारी होय. अर्थात शील समाधी प्रज्ञा ही मानवी जीवनाचे कल्याणकारी मार्ग आहे, असे प्रतिपादन केलेभदंत पूज्य भदंत विनय रख्यित महाथेरो यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा ठाणाद्वारे सत्य अन्वेषण शिबिराच्या प्रसंगी आनंद बुद्ध विहार ठाणा येथे महाथेरो बोलत होते. यावेळी उद्योजक विनोद रामटेके डॉक्टर रामरतन गेडाम व स्मारक समितीचे पदाधिकारी उपासक-उपासिका उपस्थित होते. पूज्य भदंत विनय रख्यित महाथेरो पुढे म्हणाले की, चारिका करा. जनतेला सन्मानाने जगण्याची दीक्षा द्या.
शील, समाधी, प्रज्ञा एकमेकाला पूरक आहे. तथागत बुद्धाने ही विचार त्रिपिटीकात नमूद केले आहे. त्रिपिटीकाचे वाचन करणे गरजेचे आहे. आंबेडकर राइट व बुद्धिझम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याचा प्रसार व प्रचार करणे तितकेच आनंददायी वातावरण निर्मितीस हातभार लागेल आणि देशात शांतता नांदेल. शिबिरात सावरी, कोंढी, परसोडी, खरबी, शहापूर येथील उपासक-उपासिका उपस्थित होते. संचालन व आभार मुकेश रामटेके यांनी केले.