शिक्षक भारतीतर्फे जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:44+5:302021-01-08T05:53:44+5:30

भंडारा : शिक्षक भारती संघटनेच्यावतीने सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त भंडारा जिल्ह्यातील कर्तृवत्वान शिक्षिकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. ...

Shikshak Bharati felicitates hardworking teachers in the district | शिक्षक भारतीतर्फे जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षिकांचा सत्कार

शिक्षक भारतीतर्फे जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षिकांचा सत्कार

Next

भंडारा : शिक्षक भारती संघटनेच्यावतीने सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त भंडारा जिल्ह्यातील कर्तृवत्वान शिक्षिकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे उपस्थित होते.

अतिथी म्हणून शिक्षक भारती नागपूर विभागाचे अध्यक्ष भाऊराव पत्रे, राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडिकर, राज्य संघटक प्रा. किशोर वरंभे, ओयासिस महाविद्यालयाचे संचालक प्रशांत टेभुर्णीकर, नागपूर जिल्हाध्यक्ष भारत रेहपाळे, जिल्हाध्यक्ष दिनेश पिकलमुंडे, कार्याध्यक्ष उमेश सिंगनजुडे, कार्यवाह विनोद किंदर्ले, महिला आघाडी प्रमुख धनश्री वरठे, संगीता वाघाये, नीतेश पुरी, लेखराज साखरवाडे, तालुका कार्यवाह पंकज जाधव, शिक्षक भारती मुख्याधापक संघाचे अध्यक्ष विकास वंजारी, कार्यवाह सुभाष चवडे, जि. प. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष विलास लांजेवार कार्यवाह युवराज खोब्रागडे, संघटक विलास पुरने उपस्थित होते.

ओयासिस महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिला शिक्षिकांचा सत्कार शिक्षक भारती संघटनेच्या वतीने माननीय राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे व अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात बालवक्ता कु. अवंती उमेश सिंगंनजुडे हिने सावित्रीमाईंच्या जीवनावर विचार मांडले. सवित्रीमाईचा स्त्री शिक्षणाचा वारसा पुढे चालवावा, असे आवाहन केले तथा सत्कारमूर्ती शिल्पा खंडाईत मॅडम यांनी आपल्याला देण्यात आलेल्या सत्काराबद्दल बोलताना शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाही सत्काराने पुन्हा ऊर्मी मिळाली शिक्षक व सावित्रीमाई फुले यांच्या विचारांवर पुढेही असेच कार्य करत राहण्याची ग्वाही दिली व सत्काराने आनंद द्विगुणित झाला, असे विचार व्यक्त करताना सांगितले.

याप्रसंगी सातही तालुक्यातील शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. भंडारा तालुक्यातून सौ. संध्याताई चंद्रशेखर गिरेपुंजे, रश्‍मी राजेश मोहरकर, वेदिनी भगवानजी सार्वे, सुनीता वातुजी तितीरमारे, पुष्पा गिरडकर, नलिनी अनिल गिर्हेपुंजे, शिल्पा खंडाईत, निशात नसीम खान तर लाखणी तालुक्यातून डॉ. मीरा बारई, अंजना पिंपळशेंडे, मनीषा देवेन बगमारे, राखी चंदन मोटघरे, विद्या विठ्ठल भोयर तर पवनी तालुक्यातून सत्कारमूर्ती म्हणून नीलिमा सतीश लेपसे, मंगला नथुजी गणवीर, स्नेहल दिनेश गाकरे, प्रा. मनीषा नथुजी भुरे, गजाला नाझलीन खान तर मोहाडी तालुक्यातून सत्कारमूर्ती म्हणून सुनीता गजभिये, सुनीता नितीन तोडकर, ममता खवास, उषा गोपालराव धांडे, स्मिता गालफाडे यांचा समावेश आहे. साकोली तालुक्यातून सत्कारमूर्ती म्हणून देविका दीनानाथ पटले, सुनंदा दोडकु अतकरी, राजाबाई रघुनाथ मेश्राम तर तुमसर तालुक्यातून सत्कारमूर्ती म्हणून प्रीति पडोळे, मंजुषा सिद्धार्थ नंदेश्वर, कविता नेताम, रजनी वाघाये, मनिषा समरीत तर लाखांदूर तालुक्यातून सत्कारमूर्ती म्हणून अस्मिता श्रावण बोरकर, मोहिनी अशोक रणदिवे, प्रतिभा पडोळे, रिता राऊत, रोहिणी रोकडे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील शिक्षिका व शिक्षक बांधव उपस्थित होते.

संचालन जवाहर मुंगुसमारे, प्रास्ताविक लेकराज साखरवाडे तर आभार सतीश धुर्वे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अभय भदाडे, विश्वपाल हजारे, संजय वनवे, गिरीश लुटे, जयंता लांडे, पवन सार्वे, अध्यक्ष नितीन वाघाये, देवराम फटे, गोपाल नाकाडे, ज्ञानेश्वर चौधरी, सुरेश फेंडर ,संजय लेनगुरे, लोणारे, पडोळे, ललिता ठवकर, हिरा बोंद्रे, रेखा बोपचे, राम भोपे, विवेक गायधने, नीलिमा लेपसे, पंकज जाधव, भारत कांबळी यांनी सहकार्य केले.

Web Title: Shikshak Bharati felicitates hardworking teachers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.