पिपरीत शिरले वैनगंगेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:38 PM2018-01-21T22:38:33+5:302018-01-21T22:39:11+5:30

वैनगंगा नदीवरील कवलेवाडा मांडवी गावाच्या शेजारी असणाऱ्या धरणात पाणी अडविण्यात आल्याने पिपरी (चुन्ही) गावात पाणी शिरले आहे.

Shirley Wainganga water in Pipri | पिपरीत शिरले वैनगंगेचे पाणी

पिपरीत शिरले वैनगंगेचे पाणी

Next
ठळक मुद्देपूल व रस्त्याचे निकृष्ट बांधकाम : चुल्हाड ते पिपरी गावांचा संपर्क तुटला

आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीवरील कवलेवाडा मांडवी गावाच्या शेजारी असणाऱ्या धरणात पाणी अडविण्यात आल्याने पिपरी (चुन्ही) गावात पाणी शिरले आहे. पूल आणि रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात आल्याने गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.
गोंदिया जिल्ह्यात असणाऱ्या अदानी व धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांना पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर कवलेवाडा - मांडवी गावाचे शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाणी अडविण्यात आल्याने २५ कि.मी. अंतर पर्यंत नदीपात्रात पाणीच पाणी आहे.
सिहोरा परिसरात असणाऱ्या वैनगंगा नदी काठावरील गाव शेजारी असणारे नाले तुडुंब भरले आहे. नाल्याचे पाणी गावाचे दिशेने शिरण्यास सुरुवात झाली आहे. नद्या काठावरील गावात शेतकऱ्यांना शेत शिवारात ये जा करताना त्रास होणार नाही याची दखल घेत तिरोडा उपसा सिंचन योजनेंतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात आली आहे.
पिपरी (चुन्ही) गावाचे वास्तव धरणाचे शेजारी असल्याने या गावात चुल्हाड मार्गाचे नाल्यावर पुल आणि रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु पुल आणि रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात आल्याने पाण्याचे पातळीत वाढ झाल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. रस्ता बुडाला आहे. यामुळे चुल्हाड गावासोबत असणारा गावकºयांचा संपर्क तुटला आहे. बुडीत नाले वरील पुलांची उंची वाढविण्यासाठी पुलांचे बांधकाम मंजूर आहे. पूल बांधकामात निधी खर्चात वारे न्यारे करण्यात आल्याने गावकऱ्यांचे अडचणीत वाढ झाली आहे. नाल्यावरुन प्रवास करताना गावकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. नाल्याचे पाणी गावाचे दिशेने येत असल्याने गावकºयांची धाकधुकी वाढली आहे.
दरम्यान नदी काठावरील देवरी (देव), सुकळी (नकुल) गावाचे शेतशिवारात पुल व रस्त्याचे बांधकाम करण्यात आली आहेत. सुकळी (नकुल) गावाचे लगत असणाऱ्या नाल्यावरील पुलाचे पिचींग करताना मातीचा उपयोग करण्यात आला आहे पिचींगचे कामात मुरुमाचा उपयोग करण्यात आला नाही.
पुलाचे बांधकामावर तीन कोटींचा निधी खर्च करण्यात आला असला तरी रस्त्याचे बांधकामात अल्प मुरुम घालण्यात आले आहे. यामुळे रस्त्याचे मुरुम दिसेनासे झाले आहे. शेतकऱ्यांना या मार्गाने ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम करण्यात आलेल्या पुल आणि रस्ते बांधकामात काळेबेरे झाल्याली तक्रार ग्रामपंचायत अंतर्गत तिरोडा उपसा सिंचन योजना विभागाकडे करण्यात आली आहे.

गावातील नाल्यावर वाढीव उंची असणारे पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात बांधकाम निकृष्ट करण्यात आले आहे. पाण्यात पुलाचे बांधकाम बुडीत असून गावाचे दिशेने पाणी शिरले आहे. चौकशी झाली पाहिजे..
-सुखदेव राऊत,
उपसरपंच पिपरी (चुन्ही),

Web Title: Shirley Wainganga water in Pipri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.