‘शिवभोजन’ ने मिटविली विस्थापित मजुरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:37+5:30

२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प्रश्न महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रदीप काठोळे यांच्या समोर होताच.

Shiv Bhoja erased concerns of displaced laborers | ‘शिवभोजन’ ने मिटविली विस्थापित मजुरांची चिंता

‘शिवभोजन’ ने मिटविली विस्थापित मजुरांची चिंता

Next
ठळक मुद्दे१०२२ थाळी मोफत : माविम व केंद्र चालकांचा असाही सेवाभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या काळात कामगार, बेघर व भिकारी व्यक्तींना खरा आधार मिळाला तो शासनाने सुरू केलेल्या निवारागृहाचा व शिवभोजन थाळीचा. कठीण परिस्थितीतही महिला आर्थिक विकास महामंडळाने विस्थापित व गरजू नागरीकांना त्यांच्यापर्यंत मोफत शिवभोजन थाळी पोहचवून सेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. मागील ९ दिवसात शिवभोजन केंद्रात ५५७, शासकीय वसतिगृहात ४६५ अशा १०२२ थाळी भोजन अगदी विनामूल्य दिले. यासाठी येणारा खर्च माविम अदा करणार आहे. अडचणीच्या काळात शिवभोजन थाळीने आधार दिला, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. आणि हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात आलं.
२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प्रश्न महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रदीप काठोळे यांच्या समोर होताच.
भंडारा येथील शिवभोजन केंद्र 'नवप्रभा' लोकसंचलित साधन केंद्र भंडारा यांच्या माध्यमातुन चालविल्या जाते.
व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांना आधिच मधुमेह हा आजार. पण त्यांनी सांगीतले काळजी नसावी मी बघते. अशा परिस्थितीत घरुन परवानगी मिळणार नाही ही माहिती होतीच. तरी त्यांनी होकार दिला. आणि सेवा कायार्चा प्रारंभ झाला. स्वयंपाक करणारे व व्यवस्थापन करणाऱ्या सरिता मेश्राम, सुनंदा मेश्राम, मोहन शेंडे, कुमार वैद्य यांची खरी दाद दिली पाहिजे. त्यांनीही यासाठी आपली तयारी दाखवली. मनात कोणतीही भिती नाही, जनसेवा हीच खरी सेवा हा पक्का निर्धार. कॅटिंग स्वच्छता, चवदार भोजन, येणाºयाचा आदर हा सेवाभाव एरवी दुर्मिळच. शिवभोजन केंद्रात वेळेवर पोहोचणे, जेवण तयार करणे हे लॉकडाऊनच्या काळात थोड कठीणच होत. पण घेतलेला वसा सोडायचा नाही या भावनेतून ही माणस सेवाकार्य करत आहेत. अत्यंत गरिब व अडचणीत सापडलेल्या लोकांच्या उदरनिवार्हाची व्यवस्था ही मंडळी करीत आहे. रंजना खोब्रागडे या जरी येऊ शकत नसल्या तरी घरून उत्तम व्यवस्थापन त्या करत आहेत. समाजसेवा म्हणजे आणखी असत काय.

त्यांची लाभतेय अहोरात्र सेवा
प्रशासन व पोलीस गरीब गरजूंना केंद्रात पाठवत आहेत. येणाऱ्यांचा ओघ असतोच अशा वेळी त्यांचा विश्वास राखणे हे सुद्धा आलेच. या काळात ही जबाबदारी कोणाला द्यावी हा प्रश्न होताच. पण या केंद्रचे व्यस्थापन पाहण्याकरिता एनयूएलएमचे क्षेत्रीय समन्वयक मनोज केवट यांनी ही जबाबदारी स्वीकारली. पवनी क्षेत्रीय समन्वयक ललीता कुंडलकर यांनी सतत ४ दिवस आपली सेवा दिली. लेखापाल रोशन साकुरे, रत्नमाला मेश्राम, महेंद्र गिल्लोरकर या कठीण काळात २४ तास सेवा देत आहेत.
लॉकडाऊनमध्ये कामगार, बेघर व भिकारी यांच्या उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाने शिवभोजन केंद्र पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय केला व ५ रुपये थाळी दर ठेवला. मात्र भंडारा जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने गरजूंना शिवभोजन थाळी अगदी मोफत देण्यात येत आहे. निवारागृहात असलेल्या नागरिकांना सुद्धा शिवभोजन पुरविण्यात येते. हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून केल्या जाते. माविमने १०२२ लोकांना पुरविलेल्या शिवभोजनमूळे अनेक गरीबांच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे.
- प्रदिप काठोळे, व्यवस्थापक माविम, भंडारा

Web Title: Shiv Bhoja erased concerns of displaced laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.