कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:45 PM2017-09-11T23:45:18+5:302017-09-11T23:45:34+5:30
शिवसेनेच्या वतीने शेतकºयांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दसºयापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त करा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शिवसेनेच्या वतीने शेतकºयांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दसºयापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त करा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. शिवसेना जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांनी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर केले.
अनेक शेतकरी स्वत:चे महत्त्वाची कामे सोडून डोकेदुखी ठरणारी आॅनलाईन कर्जमुक्ती करिता दिवसभर रांगेत उभे राहतात. परंतु अजूनपर्यंत एकही शेतकºयांचा सातबारा कोरा झालेला नाही. आॅनलाईन फॉर्म भरून झालेल्या शेतकºयांच्या खात्यावर आजही कर्ज आहे. बळीराजा मानसिक ताण घेऊन मुदतीच्या पूर्वी आॅनलाईन फॉर्म भरून झाले पाहिजे यासाठी संघर्ष करीत आहे. अनेक सेतू केंद्रावर आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेतकºयांकडून अधिकची रक्कमही उकळत आहेत. अधिकाºयांचे याकडे कानाडोळा होत आहे. व्यवस्थेत गती यावी यासाठी रचनात्मक सुधार करून शेतकºयांना त्रास न देता शक्य तितक्या लवकर दसºयापूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त करण्यात यावे. दसºयापूर्वी शेतकºयांना कर्जमुक्त केले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही राजेंद्र पटले यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख इंजी. राजेंद्र पटले, यशवंत वंजारी, संदीप वाकडे, पंचायत समिती उपसभापती ललित बोन्द्रे, जिल्हा सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख अनिल गायधने, अरविंद बनकर, किशोर चन्ने, भरत वंजारी, राजू ब्राम्हणकर, पवन चव्हाण, महेश पटले, सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, मनोहर जांगळे, अॅड. रवी वाढई, मोईन रहमान शेख, सतीश तुरकर, तोपलाल रहांगडालयासह असंख्य शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.