शिवसेनेचा हुंकार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:06 PM2018-07-11T22:06:52+5:302018-07-11T22:07:10+5:30
जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही. अड्याळ येथील मारहाण प्रकरणी पोलीस अधीक्षक व तत्कालीन ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने आज गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर हुंकार मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही. अड्याळ येथील मारहाण प्रकरणी पोलीस अधीक्षक व तत्कालीन ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने आज गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर हुंकार मोर्चा काढला.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी हुतात्मा स्मारक परिसरात जिल्हाभरातील शिवसैनिक एकत्र आले. त्यानंतर दुपारी १ वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात पवनी तालुक्यातील सौंदड येथे झालेल्या मारहाण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, या घटनेत दोषी असलेल्या ठाणेदार यशवंत किचक यांना निलंबित करण्यात यावे, या मारहाणीत जखमी झालेल्या सौंदड येथील नागरिकांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी आणि भंडारा जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, संजय रेहपाडे, लवकुश निर्वाण यांच्यासह सुरेश धुर्वे, मुकेश थोटे, अनिल गायधने, अमित मेश्राम यांच्यासह भंडारा, अड्याळ येथील शिवसैनिकांचा समावेश होता.