शिवलालच्या मुलांचे पुन्हा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:08 AM2019-06-14T01:08:19+5:302019-06-14T01:08:52+5:30
अतिक्रमित घर पाडल्यानंतर मुलांनी उपोषण आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने विविध आश्वासने दिली होती. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या दोन मुलांनी पुन्हा गुरूवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : अतिक्रमित घर पाडल्यानंतर मुलांनी उपोषण आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने विविध आश्वासने दिली होती. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्यापही झाली नसल्याने सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या दोन मुलांनी पुन्हा गुरूवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
अतिक्रमणाच्या नावाखाली शिवलाल लिल्हारेचे घर पाडण्यात आले. शिवलाल आजारी पडला तर त्याच्या दोन मुलांनी न्यायासाठी तहसीलसमोर तीन दिवस आमरण उपोषण सुरु केले. गावकऱ्यांनी तहसील कार्यालयाला घेराव घातला. तहसीलदारांनी ३ जून रोजी काही आश्वासने दिली. मात्र या प्रकरणाचा निपटारा झाला नाही. त्यामुळे पुन्हा गुरवारपासून शिवलालचे समीर व सतीश ही दोन मुले तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसली आहेत. सायंकाळी उपविभागीय अधिकारी तोंडगावकर, तहसीलदार धनंजय देशमुख, पोलीस निरीक्षक शिवाजी कदम आणि आंदोलनकर्त्याच्यावतीने राजु कारेमोरे माधव बांते, नरेश डहारे, सलीम पठाण, संजय शहारे यांनी वाटाघाटी सुरु केल्या. तहसीलदारांनी शिवलाल लिल्हारे यांना भुखंड देण्याचे मान्य केले. सोमवारपर्यंत प्रश्न निकाली काढला जाईल.