पाहुणा म्हणून आलेल्या पुतण्याने चाेरले साेन्याचे शिवलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:38 AM2021-09-26T04:38:04+5:302021-09-26T04:38:04+5:30
रमेश केशवप्रसाद पांडे (६६) यांचे एलाेरा पेपरमिल गेटजवळ देव्हाडा येथे घर आहे. ते परिवारासह राहतात. दाेन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे उत्तर ...
रमेश केशवप्रसाद पांडे (६६) यांचे एलाेरा पेपरमिल गेटजवळ देव्हाडा येथे घर आहे. ते परिवारासह राहतात. दाेन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातून पुतण्या सुकेशकुमार आनंदस्वरूप पांडे (२२), रा. पडमई, जि. बांधा हा पाहुणा म्हणून आला. घरी पुतण्या आल्याने काकाला माेठा आनंद झाला. मात्र, दाेन महिने काकाकडे वास्तव्य करून १४ ऑगस्ट राेजी ताे आपल्या गावाकडे गेला. दरम्यान, शुक्रवारी २४ सप्टेंबर राेजी घरातील दागिने बेपत्ता असल्याचे पांडे यांच्या लक्षात आले. शाेधाशाेध केली परंतु थांगपत्ता लागला नाही. पुतण्यानेच दागिने लंपास केल्याचा संशय बळावला. त्यावरून करडी पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पुतण्या सुकेशकुमारने घरातील टिनाच्या पेटीतून एक ताेडा वजनाचे साेन्याचे शिवलिंग, दाेन ग्रॅम वजनाची साेन्याची मूर्ती, साेन्याचे नाग आणि राेख १८ हजार रुपये असा एकूण ५७ हजारांचा मुद्देमाल घेऊन पाेबारा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पाेलीस नायक राघाेर्ते करीत आहे.