शिवसेनेकडून शेतकºयांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:05 AM2017-10-25T00:05:51+5:302017-10-25T00:06:07+5:30
राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून धान कापणीच्या पूर्वीच शेतकºयांचे धान खुल्या बाजारात कवडीमोल भावात विकल्या जावू नये, यासाठी वेळेतच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून धान कापणीच्या पूर्वीच शेतकºयांचे धान खुल्या बाजारात कवडीमोल भावात विकल्या जावू नये, यासाठी वेळेतच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे जिल्ह्यात ३ आॅक्टोंबरला धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकºयांनी धान पिक कमी प्रमाणात लावले. पाण्याअभावी शेतकºयांना यंदा धानाच्या उत्त्पन्नात घट झाली आहे. याची दखल घेऊन शासनातर्फे ३ आॅक्टोबर रोजी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. शेतकºयांची धान कापणी झाालेली नसल्यामुळे शेतकरी धान विक्रीसाठी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले नसले तरी बहुतांश ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. परंतू जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झाले किंवा नाहीत याची शिवसेनेने कुठलिही शहानिशा न करता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शेतकºयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून शेतकºयांनी अशा अपप्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन आ.चरण वाघमारे यांनी केले आहे.