जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा बैलबंडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:21 PM2017-10-23T23:21:41+5:302017-10-23T23:21:58+5:30
धान खरेदी केंद्र सुरु करा व शेतीच्या पंचनाम्याच्या आधारावर नुकसान भरपाई द्यावी या मागणीला घेऊन शिवसेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धान खरेदी केंद्र सुरु करा व शेतीच्या पंचनाम्याच्या आधारावर नुकसान भरपाई द्यावी या मागणीला घेऊन शिवसेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.
धान उत्पादक जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीपूर्वी शेतकºयांचे धान शासनाने ठरवून दिलेल्या किमतीनुसार विकत घ्यावे यासाठी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. मात्र आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्याने, धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जिल्ह्यातील शेतकºयांची स्थिती पाहता या हंगामात दिवाळीपूर्वी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करणे आवश्यक होते. मात्र दिवाळी होऊनही आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्यामुळे शेतकºयांना मिळेल त्या दराने धान खाजगी व्यापाºयाला व कृषी उत्पन्न बाजार समितीत नेऊन विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चानंतर निवेदन स्वीकारण्या साठी जिल्हाधिकाºयांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलक माघारी परतले. त्यानंतर संतप्त शिवसैनिक प्रशासनाविरूद्ध घोषणा देत तेथून परतले. या बैलबंडी मोर्चात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.