शिवसेनेचे ढोल वाजवा आंदोलन

By admin | Published: July 11, 2017 12:19 AM2017-07-11T00:19:14+5:302017-07-11T00:19:14+5:30

कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, यासाठी शिवसेनेच्यावतीने भंडारा जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, ...

Shivsena's Dhol Baja Movement | शिवसेनेचे ढोल वाजवा आंदोलन

शिवसेनेचे ढोल वाजवा आंदोलन

Next

बँकेसमोर वाजविले डफडे : कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, यासाठी शिवसेनेच्यावतीने भंडारा जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात ढोल-डफडी वाजवा आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाविरूद्ध घोषणा दिल्या.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नाही. कर्जमुक्ती संदर्भातील निर्णय रोज बदलत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत शिवसेना आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी सांगितले. शिवसेनेने आज सोमवारला बँकांमध्ये कर्जमुक्ती शेतकरी आणि प्रत्यक्षात मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी गोळा करण्यासाठी जिल्हा बँकेसमोर ढोल व डफडी वाजवा आंदोलन केले.
यावेळी शिवसैनिकांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीवरून एकाही शेतकऱ्यांना एक रूपयाचे सुद्धा कर्जमाफ करण्यात आले नसल्याचे दिसून शासनाने केवळ कर्जमुक्तीची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात अंबलबजावणी केली नाही. जिल्हा बँकेने दिलेल्या पत्रात कर्जमुक्तीचे शासनाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे नमूद आहे. या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख संजय रेहेपाडे, दिनेश पांडे, अमित मेश्राम, महेश पटले, उपसभापती ललित बोंद्रे, शहरप्रमुख सूर्यकांत इलमे, यशवंत सोनकुसरे, रोशन कळंबे, मुकेश थोटे, मनोहर जांगळे, माजी सरपंच विनोद रहांगडाले, कुंजीलाल पटले, विजय निमजे, तोपलाल रहांगडाले, जयपाल सार्वे, आर भांडके, संदीप सार्वे, पराग वघरे, अनिल बाबारे, ताराचंद अकत्तरी, प्रभू हटवार, बाळा वाघमारे, संजय आखरे, नरेश लांजेवार, आकाश खरोले, संजय दमाहे, अक्षय तुमसरे, नितेश देशमुख, अजय चामलाटे, अविनाश संत्तेकर, सुधीर ठाकरे, राजेश चंदेल, प्रकाश चौधरी, नितीन साकुरे सहभागी झाले होते.

Web Title: Shivsena's Dhol Baja Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.