धक्कादायक ! चक्क बँकेतूनच मिळाल्या शंभरच्या नकली नोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 10:38 AM2023-08-11T10:38:44+5:302023-08-11T10:41:16+5:30

चौकशीची मागणी : तुमसरातील इंडियन ओव्हरसीज बँकेतील प्रकार

Shocking! customer were received fake notes of Rs 100 from indian overseas bank of bhandara | धक्कादायक ! चक्क बँकेतूनच मिळाल्या शंभरच्या नकली नोटा

धक्कादायक ! चक्क बँकेतूनच मिळाल्या शंभरच्या नकली नोटा

googlenewsNext

राहुल भुतांगे

तुमसर (भंडारा) : स्थानिक इंडियन ओव्हरसीज बँकेमधून चक्क नकली नोटा मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार १० ऑगस्ट रोजी पहावयास मिळाला. यामुळे खातेदारांत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.

एक शाळकरी विद्यार्थ्याने फी भरण्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेतील आपल्या खात्यामधून पैसे काढले. पैसे घेऊन कॉलेजमध्ये जमा करण्याकरिता गेला असता त्यात १०० रुपयांच्या ४ नोटा नकली असल्याचे महाविद्यालयातील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता त्याने सर्व पैसे आताच बँकेतून काढून आणल्याचे सांगितले. त्यावर त्या कर्मचाऱ्याने तात्काळ बँकेत जाऊन नोटा बदलून घेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, त्या विद्यार्थ्याने वेळ वाया न घालवता बँकेकडे धाव घेतली. कॅशिअरला १००च्या नोटा नकली आहेत, असे म्हणत शंभरच्या नोटा बदलण्यास कॅशिअरकडे दिले. सदर नोटा नकली आहेत याची कल्पना बँक कॅशिअरला होती, त्यामुळे त्याने त्या विद्यार्थ्यांची कसलीही विचारपूस न करता पटकन नोटा बदलवून दिल्या. जर बँकेमधूनच अशा प्रकारचे व्यवहार घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे बघावे, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

या प्रकरणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शहानिशा करण्याकरिता मॅनेजर व कर्मचाऱ्यांची चर्चा केली असता नोट चेक करायची मशीन काल बिघडलेली होती, आमच्याकडून चूक झाली आहे, असे म्हणून वेळ मारून नेली. आता पुढे काय करायचे आहे, ते सांगा असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली.

अन् कॅशिअर गेले बाहेर

नकली नोटांचा प्रकार उघडकीस येताच बँकेचे कॅशिअर अर्धा तास बाहेर जातो व नकली नोटा बँकेतून गायब होतात. याचा अर्थ तरी काय? जर या ग्राहकाने बँकेत जमा करण्यासाठी नकली नोटा दिल्या असत्या तर त्याची चौकशी झाली असती. मग, बँकेमधून नकली नोटा मिळाल्याने चौकशी होणे गरजचे नाही काय? प्रकरणी खातेदारांची होणारी फसवणूक थांबवावी, अशी मागणी खातेदारांनी केली आहे.

Web Title: Shocking! customer were received fake notes of Rs 100 from indian overseas bank of bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.