वैनगंगा नदीपात्रात ‘नाळ’ चित्रपटाचे शुटिंग

By Admin | Published: January 31, 2017 01:11 AM2017-01-31T01:11:57+5:302017-01-31T01:11:57+5:30

मृदगंध फिल्म निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंढरी (बुज) येथील वैनगंगा

Shooting of 'Nal' in Wainganga river basin | वैनगंगा नदीपात्रात ‘नाळ’ चित्रपटाचे शुटिंग

वैनगंगा नदीपात्रात ‘नाळ’ चित्रपटाचे शुटिंग

googlenewsNext

गुगल मॅपवरुन केली स्थळाची निवड : ढोरवाडा, मुंढरी नदीपात्रात चित्रीकरणाला प्रारंभ
तुमसर/मोहाडी/करडी : मृदगंध फिल्म निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंढरी (बुज) येथील वैनगंगा नदीपात्रात सुरूवात झाली आहे. चित्रपटाचा निर्माता सुधाकर रेड्डी असून हा चित्रपट लहान मुलांच्या मनातील संघर्षावर आधारित आहे.
या चित्रपटातील चैतन्य या दत्तक घेतलेल्या मुलाला खऱ्या आईला भेटण्याची प्रबळ ईच्छा असते. तिच्या शोधात त्यांच्या जीवाची होणारी घालमेल, त्याला येणारे विविध अनुभव व धाडसी प्रसंगाचे चित्रण या माध्यमातून साकारले जाणार आहेत.
‘नाळ’ चित्रपटाच्या ‘आउटडोर’ शुटींग स्थळांसाठी गुगल मॅपचा वापर करण्यात आला. चित्रपटाच्या कथानकानुसार नैसर्र्गिक स्थळासाठी वैनगंगा नदीपात्राची निवड करण्यात आली. करडी परीसरातील वैनगंगा नदीचे पात्र मोठे असून असे सुंदर ठिकाण महाराष्ट्रात कुठेही दिसून आलेले नाही.
या चित्रपटातील नायक नदीकाठी वसलेल्या गावातील असून नदीचे विशाल पात्र पार करताना तो ग्रामीण भागातील बैल, बंडी व अन्य साधनांचा वापर करतो.
गावातील जीवन नदीशी कसे एकवटलेले असते. गावातील व्यवसाय, आरोग्याच्या सुविधा, मंदिर व एकंदर परिस्थितीशी सुसंगत स्थळ गुगलवरुन दिसून आल्याने या स्थळाची निवड करण्यात आली. मुंढरी बुज, ढोरवाडा या गावात व परिसरातही चित्रपटाचे इनडोर शुटींग केले जाणार आहेत, अशी माहिती चित्रपटाचे कार्यकारी निर्माता लक्ष्मीकांत कलगुटकर यांनी सदर प्रतिनिधीला दिली. या चित्रपटात मराठी फिल्म ‘सैराट’मधील काही कलावंतासोबत स्थानिक कलावंतांना सुध्दा संधी देण्यात आली आहे. भंडारा व अमरावती शहरातील कलावंतांचा सुध्दा या चित्रपटात समावेश आहे. यातील कलावंत कलेला जपणारे आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कलावंतांचा डेरा गावात लागला असून त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. (लोकमत चमू)

Web Title: Shooting of 'Nal' in Wainganga river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.