रस्त्यावर दुकाने; नागरिकांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 05:00 AM2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:28+5:30
राजीव गांधी चौक ते नगरपालिका चौक आणि गांधी चौक ते पोस्ट ऑफीस पासून बसस्थानक परिसरापासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडूनच अभय मिळत आहे की काय असे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेले बांधकाम, दुकानांचे शेड, टपऱ्या, भाजी विक्रेते, हातगाड्या अशा अतिक्रमणांनी रस्ता व्यापून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील रस्ते सुधारण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण रस्त्याची अवस्था सुधरताना दिसत नाही. कारण शहरातील बहुतांश रस्त्यांवर दुकानदार अतिक्रमण करीत आहेत. दुकानातील साहित्य फुटपाथवर मांडले जाते. त्यात आणखी भर पडत आहे. असेच काहीसे चित्र राजीव गांधी चौक ते गांधी चौक येथील गांधी चौक आणि मोठा बाजार परिसर ते त्रिमूर्ती चौकमार्गे बसस्थानक जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी दिसून येत आहे.
राजीव गांधी चौक ते नगरपालिका चौक आणि गांधी चौक ते पोस्ट ऑफीस पासून बसस्थानक परिसरापासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडूनच अभय मिळत आहे की काय असे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेले बांधकाम, दुकानांचे शेड, टपऱ्या, भाजी विक्रेते, हातगाड्या अशा अतिक्रमणांनी रस्ता व्यापून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.
शहरातील रस्ते सुधारण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण रस्त्याची अवस्था सुधारताना दिसत नाही. कारण शहरातील बहुतांश रस्त्यांवर दुकानदार अतिक्रमण करीत आहेत. दुकानातील साहित्य फुटपाथवर मांडले जात आहे. त्यामध्ये दररोज आणखी भर पडत आहे.
या मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत असलेले बांधकाम, दुकानांचे शेड, टपऱ्यां, भाजी विक्रेते, हातगाड्या अशा अतिक्रमणांनी रस्ता व्यापून गेल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक आणि पादचाºयांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.
चौकाच्या शेजारीच फूड प्लाझा, गॅरेज आहे. शिवाय पार्र्किंगची सुविधाच नसल्याने या ठिकाणी येणारे खवय्ये आपली वाहने थेट रस्त्यावरच उभी करुन मोकळे होतात. शिवाय चौकात असलेल्या हॉटेल आणि गॅरेजसमोर उभी केलेली वाहनेही रस्त्यावर येत असल्याचे दिसून येते. फळविक्रेते, रिक्षा आणि टपºयांमुळेही हा चौक अतिक्रमाणाच्या विळख्यात सापडला आहे. सायंकाळनंतर तर परिस्थीति आणखी बदलते. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते. गेल्या काही वर्षात वाहनाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून सर्वाधिक वापर केल्या जाणाऱ्यां रस्त्यावर ठिकठिकाणी वेळोवेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. भंडारा शहरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती चौकाचौकात करण्यात आली आहे. परंतु रस्त्यावरील अतिक्रमण व त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस पुढाकार घेत नाही.
कच्चे, पक्के बांधकाम करुन अतिक्रमण
ठिकठिकाणी व्यावसायिक, दुकानदारांनी कच्चे, पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केल्याचे दिसून येते. दुकानांची शेड रस्त्यालगत आली आहेत. पादचाºयांना भर रस्त्यावरुनच चालावे लागते. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे फुटपाथवर दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत. फुटपाथवर वाहनधारकांनी कब्जा केल्यामुळे रिक्षाचालक रस्त्यावर रिक्षा उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन वाहतूक जाम होते.
व्यवसायातील स्पर्धेमुळे अतिक्रमण
आपल्या दुकानापेक्षा शेजाऱ्यांचे दुकान समोर आहे. त्यामुळे आपल्याकडे ग्राहक कमी येतील या भितीपोटी दुकानदार दुकानासमोर साहित्य ठेवतात आणि शेजाºयाची बरोबरी करतात. या स्पर्धेतून रस्त्यावर अतिक्रमण होते. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. काही वेळा नगर पालिकाचे अतिक्रमण हटाव पथक कारवाई करते. कारवाई करुन पथक निघून गेले की पुन्हा दुकानदार पाहिल्यासारखेच दुकान थाटतात. जोपर्यंत दुकानदारांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमणे कमी होणार नाहीत, असे काही व्यवसायीकांचे मत आहे.
अपघातात वाढ
रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होवून अपघात होतात. नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमणाकडे आणि वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष दिल्यास अपघात कमी होतील. नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यास अतिक्रमणे कमी होती त्यामुळे वाहतुकीला अडचण होणार नाही. पण दोन्ही प्रशासनामधील अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. फुटपाथ आणि रस्त्यावर दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहने उभे राहतात त्यामुळे पादचारी नागरिक रस्त्यावरुन ये-जा करतात.सिग्नल गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक वाढली की रात्री वाहनांची गर्दी होते. त्यामुळे अनेक वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. वाहनांच्या आणि रस्त्यावरील अतिक्रमणाच्या गर्दीतून मार्ग काढताना अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता असते.