करडी येथे शार्टसर्किटमुळे घराला आग, जीवनोपयोगी साहित्य जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:02 PM2024-05-11T22:02:53+5:302024-05-11T22:03:16+5:30
या घटनेमुळे शेतमजूर कुटुंबावर संकट कोसळले आहे. प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
भंडारा : मोहाडी तालुक्यातील करडी येथील शरद तितीरमारे यांच्या घराला शार्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना ११ मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आगीत घरातील फ्रिज व जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
करडी येथील शरद बंडू तितीरमारे शेतमजूर आहेत. घराला आग लागली तेव्हा घरातील सर्व मंडळी कामावर गेले होते. घरी कुणीही नव्हते. घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांना दिसून आले. नागरिकांनी घराला लावलेला कुलूप तोडून आग विझविली. तोपर्यंत घरातील जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनेचा पंचनामा करडीचे मंडळ अधिकारी देशमुख यांचे मार्गदर्शनात तलाठी अमृते व कोतवाल साठवणे यांनी केला. या घटनेमुळे शेतमजूर कुटुंबावर संकट कोसळले आहे. प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.