साई मंदिरात श्रावण मास समाप्ती सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:33 AM2021-09-13T04:33:54+5:302021-09-13T04:33:54+5:30

पालांदूर : येथील बाजार चौकातील साई मंदिरात ऋषीपंचमीच्या दिवशी श्री गजानन महाराज पुण्यतिथी व श्रावण मास समाप्ती सोहळा ...

Shravan Mass Closing Ceremony at Sai Temple | साई मंदिरात श्रावण मास समाप्ती सोहळा

साई मंदिरात श्रावण मास समाप्ती सोहळा

googlenewsNext

पालांदूर : येथील बाजार चौकातील साई मंदिरात ऋषीपंचमीच्या दिवशी श्री गजानन महाराज पुण्यतिथी व श्रावण मास समाप्ती सोहळा कोरोनाच्या सावटात अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडण्यात आला. दरवर्षीप्रमाणे श्री साईबाबा मंदिर पालांदूर येथे श्रावण मास सोहळा आणि गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त गोपाल काल्याचा कार्यक्रम भक्तगणांच्या हजेरीत पार पडला. सकाळी साई मूर्तीला अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी भक्तगणांना मंदिर कमिटीचे अध्यक्ष भरत खंडाईत यांच्या हस्ते वस्त्र दान करण्यात आले. दुपारी भजन संध्या व गोपाल काल्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी भक्तगणांसह उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.

ऋषीपंचमीच्या दिवशी गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. भारतीय संस्कृती ऋषिपंचमीला खूप मोठे महत्त्व आहे. पालांदूर येथील भक्तमंडळी दरवर्षी ऋषिपंचमी च्या निमित्ताने गजानन मंदिर शेगाव येथे दर्शनासाठी जातात. परंतु कोरोनाच्या संकटाने जाता न आल्याने पालांदूर येथील साई मंदिरात गोपाल काल्याच्या कार्यक्रम करीत साईदर्शन सोहळा पार पडला.

कार्यक्रमाकरिता मंदिरचे अध्यक्ष भरत खंडाईत, पुजारी महादेव बागळकर, सचिव अर्जुन खंडाईत, कोषाध्यक्ष रामकृष्ण गायधने, भक्तगणात वसंता हटवार, संतोष झिंगरे, तेजराम खंडाईत, के. ना. कापसे गुरुजी, हरिदास बडोले, प्राध्यापक आनंदराव मदनकर, डॉ. आशिष गभने, मोरेस्वर खंडाईत, प्रमोद लांडगे, मंगेश खंडाईत, श्यामाजी बेंदवार, भोजराम तलमले, सुरेश धकाते, सुनील उरकुडे, मुरलीधर मोहतुरे, केशव कुंभरे, विनोद खंडाईत, वैशाली खंडाईत, उषा बागडकर, रेखा हटवार, शीला खंडाईत, चंद्रकला धकाते, कुसुम खंडाईत, इंदिरा राऊत, लता खंडाईत, निर्मला खंडाईत, तबलावादक मेघराज बावणे, भुमेश्वरी खंडाईत, डॉक्टर पल्लवी खंडाईत, शुभांगी खंडाईत, शुभांगी मदनकर, सुशीला खंडाईत, सुमित्रा खंडाईत, तथा साई भजनी मंडळ जेवणाळा व दुर्गा भजनी मंडळ पालांदूर यांचे सहकार्य लाभले. सर्व साईभक्तांच्या सहर्ष सहकार्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Web Title: Shravan Mass Closing Ceremony at Sai Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.