श्रावणबाळचा निधी सहा महिन्यांपासून रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:35 AM2021-03-05T04:35:30+5:302021-03-05T04:35:30+5:30
शासनाने निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना व अर्थसाहाय्य अशा योजना सुरू केल्या ...
शासनाने निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना व अर्थसाहाय्य अशा योजना सुरू केल्या आहेत. श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. मागील सहा महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. कुटुंब प्रमुखाच्या मृत्यू झाला असल्यास वीस हजारांचे अर्थसाहाय्य शासनाकडून दिले जाते. हा निधीही वेळेवर येत नसल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे. दर महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होत नाही, अनेक लाभार्थी तहसील कार्यालयाच्या चकरा मारतात. शासनाकडून निधी आला नाही असे त्यांना सांगण्यात येते. आल्या पावली त्यांना निराश होऊन जावे लागते. दर महिन्याला नियमितपणे निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना निधी देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.
तुटपुंजा निधी शासन देत असल्याने नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असल्याचे माजी सभापती कलाम शेख यांनी सांगितले.
अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांचा श्रावणबाळ योजनेचा निधी शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात निधी वळते करण्यात आले नाही. निधी आल्यानंतर त्यांच्या खात्यात निधी वळते करण्यात येईल.
अशोक पाटील, नायब तहसीलदार, तुमसर