सालई येथे श्री संत गुलाब बाबा वार्षिक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:10+5:302021-03-04T05:06:10+5:30
उसर्रा : सालई खुर्द येथे श्री संत गुलाब बाबा यांच्या वार्षिक महोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. सन १९९४ला या ...
उसर्रा : सालई खुर्द येथे श्री संत गुलाब बाबा यांच्या वार्षिक महोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. सन १९९४ला या तिथीला श्री संत गुलाब बाबा यांचे आगमन झाले होते, तेव्हापासून दरवर्षी पौर्णिमेस हा कार्यक्रम साजरा होत असतो. सालई येथे भंडारा जिल्ह्यातील प्रथम मंदिर निर्माण झालेले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी किसान काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष देवा इलमे, व्यास डोंगरवर, रिता हलमारे, सुभाष गायधने, सरपंच अनिता पटले, उपसरपंच लक्ष्मीकांत सव्वालाखे, नंदलाल लिल्हारे उपस्थित होते. या निमित्ताने सकाळी अभिषेक पूजा व दुपारी हरिभक्त परायण जयसिंग कस्तुरे महाराज कान्हळगाव यांनी समाज जागृतीवर प्रवचन अनेकांना मार्गदर्शक ठरले. गोपाळकाला व दहीहंडी कार्यक्रम करण्यात आले. संचालन लक्ष्मीकांत सव्वालाखे यांनी तर प्रास्ताविक धनिराम मांढरे यांनी व आभार नंदलाल लिल्हारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी यावेळी अमरकंठ सव्वालाखे, मोतीलाल अठराये, धनपाल नागपुरे, मारोती बघेले, धर्मराज राणे, तुळशीराम पटले, भूषण ठाकरे, राजू सव्वालाखे, भारत पटले, शंकर गराडे, राजू लिल्हारे, महेश दमाहे, रंगलाल लिल्हारे, गुलशन अठराहे, प्रवीण लिल्हारे, दर्शन लिल्हारे, दुर्गेश लिल्हारे, मयूर लिल्हारे, रोहित सोनवाणे, प्रशांत दमाहे, प्रवीण सव्वालाखे, शिवकुमार बन्सोड, शुभम गराडे, धम्मदीप खांडेकर व ग्रामवासी उपस्थित होते.