श्रीमद् भागवत म्हणजे जीवन उद्धाराचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:48+5:302021-02-05T08:42:48+5:30
लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात श्रीमद्भागवत प्रवचनाच्या अनुषंगाने ग्रंथाचे महत्त्व प्रास्ताविकातून परिचयात्मक रीतीने भक्तगणांना सांगितले. त्या म्हणाल्या, ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात श्रीमद्भागवत प्रवचनाच्या अनुषंगाने ग्रंथाचे महत्त्व प्रास्ताविकातून परिचयात्मक रीतीने भक्तगणांना सांगितले.
त्या म्हणाल्या, श्रीमद् भागवत श्रवणाने ज्ञानगंगा प्रभावित होते. भगवंताविषयी आसक्ती वाढून संसारातून विरक्ती निर्माण होते. संगीतमय संचाकरिता सिंथ वादक सदानंद महाराज पुरी, गायक पुष्पा लातूरकर, तबलावादक किशोर महाराज अडकिने, गायक राजाभाऊ महाराज राठोड, मृदंग वादक सदानंद महाराज शेगाव, हभप भागवताचार्य दिगंबर महाराज पंढरपूरकर आदींच्या साथीने भागवत सप्ताह सुरू झालेला आहे.
मंगळवार रोजी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर संत मंडळींचे मंदिराच्या प्रवेशद्वारात भागवत सप्ताह कमिटी व भक्तगणांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
दैनंदिन कार्यक्रमात काकड आरती सकाळी साडेपाच ते साडेसहा, दिंडी अर्थात रामधून सकाळी साडेसात ते नऊ वाजता, भागवत प्रवचन सकाळी साडेनऊ ते बारा, दुपारी तीन ते साडेपाच, हरिपाठ सायंकाळी साडेसहा ते साडेसात, भजन व हरिकीर्तन रात्री नऊ ते अकरा वाजता आयोजित केलेले आहे. काकड आरती व हरिपाठ प्रवचनकार महाराजांचा पूर्ण संच पार पडेल. या संचाला पालांदूर येथील हभप नारायण काजळखाने महाराज व दशरथ मेश्राम तथा हनुमान भजनी मंडळ पालांदूर सहकार्य करीत आहेत.