झाडीपट्टीतील कलावंतांनी साकारला विक्रमादित्य चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:38 PM2018-01-20T22:38:20+5:302018-01-20T22:38:46+5:30

झाडीपट्टी कलावंतांची खाण आहे. तमाशा, नाटक आणि आता चित्रपटसृष्टीत देखील वैदर्भीय प्रामुख्याने झाडीपट्टीतील कलावंतांनी पाय रोवला आहे.

The shrimp artistes set up Vikramaditya film | झाडीपट्टीतील कलावंतांनी साकारला विक्रमादित्य चित्रपट

झाडीपट्टीतील कलावंतांनी साकारला विक्रमादित्य चित्रपट

Next
ठळक मुद्देपवनीत झाले चित्रीकरण : वैदर्भीय कलावंत रंगभूमीवर

आॅनलाईन लोकमत
पवनी : झाडीपट्टी कलावंतांची खाण आहे. तमाशा, नाटक आणि आता चित्रपटसृष्टीत देखील वैदर्भीय प्रामुख्याने झाडीपट्टीतील कलावंतांनी पाय रोवला आहे.
अनाथ बालकांच्या जीवनावर आधारित विक्रमादित्य हा चित्रपट हिंदीत असला तरी मराठी कलावंत यात भूमिका करीत आहेत. पवनी तालुक्यातील गोसेखुर्द राषट्रीय प्रकल्प, ऐतिहासिक परकोट, धरणीधर श्री गणेश मंदिर, गांधी चौक, लक्ष्मीरमा सांस्कृतिक सभागृह याठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले.
दिनेश मोहाडीकर, मुनमुन मोहाडीकर, अश्विन वघाले, सुनिल हिरेकन, तोमेश्वर पंचभाई, बालकलाकार श्रेयश महेंद्र वैद्य व क्षितिज राजेश चावके, प्रशांत गाडगे, सजेर्राव गलपट आणि कॅमेरा मन विमुक्स अंबादे यांच्या सहभागाने साकारत असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी पवनीकरांनी गांधी चौकात एकच गर्दी केली होती.

Web Title: The shrimp artistes set up Vikramaditya film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.