धारगाव आरोग्य केंद्रातील कर्मचारी वसाहतीमध्ये झुडपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:40 AM2021-08-17T04:40:39+5:302021-08-17T04:40:39+5:30
या आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना स्थानिक वसाहतीमध्ये राहण्यासाठी शासनअंतर्गत सोय करून देण्यात आली असली तरी येथे कर्मचारी राहत ...
या आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना स्थानिक वसाहतीमध्ये राहण्यासाठी शासनअंतर्गत सोय करून देण्यात आली असली तरी येथे कर्मचारी राहत नाही. त्यामुळे या वसाहतीला झुडपी जंगलाने वेढलेले असून या वसाहतीची दुरवस्था झालेली आहे. स्थानिक जनतेला २४ तास आरोग्याच्या सुविधा उपलब्ध हव्यात, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र, कर्मचारी या वसाहतीमध्ये राहणे पसंद करत नसल्याने व येण्या-जाण्याची साधने उपलब्ध असल्याने एकही कर्मचारी येथे स्थानिक राहत नाही. एकेकाळी या वसाहतीमध्ये अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची कुटुंबे राहत होती. त्यामुळे त्या वसाहतीची निगा राखली जात होती. या वसाहतीमध्ये असलेला डांबरीकरणाचा रस्ता पूर्णपणे झाडाझुडपांनी वेढलेला असून तो पूर्णपणे बंद झालेला आहे. येथील वसाहतीमधील अनेक खोल्या कुलूपबंद दिसत आहेत.