झाडीपट्टी रंगभूमीने आता सोशल साईटवर कोरले नाव!

By admin | Published: November 28, 2015 01:48 AM2015-11-28T01:48:48+5:302015-11-28T01:48:48+5:30

झाडीपट्टी रंगभूमीतील नाटक कंपन्यांनी आता फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर स्वत:चे फेसबुक खाते उघडून ...

Shrubtheti now plays a prominent name on the social network! | झाडीपट्टी रंगभूमीने आता सोशल साईटवर कोरले नाव!

झाडीपट्टी रंगभूमीने आता सोशल साईटवर कोरले नाव!

Next

लाखांदूर : झाडीपट्टी रंगभूमीतील नाटक कंपन्यांनी आता फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर स्वत:चे फेसबुक खाते उघडून त्यावरुन आपल्या कंपनीतील नाटकांचे पोस्टर आॅनलाईन पोस्ट करीत आहेत. सदर पोस्ट सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसारित होते. याचाच अर्थ झाडीची नाटक झाडीपट्टीच्या सीमा पार करुन ग्लोबल झाली आहे. यातून नाटक कंपन्यांनी नाटकांचा आॅनलाईन प्रचार व प्रसार करुन झाडीपट्टी रंगभुमीच्या इतिहासात सोनेरी पान लिहिले आहे.
कवी कुलगुरु कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख ‘सौराज्य रम्य’ अशा सार्थ शब्दात केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत करता येतो. या झाडीच्या पट्टीत बोलली जाणारी बोलीभाषा म्हणजे झाडीबोली. या चार जिल्ह्यांच्या विस्तीर्ण अशा भूभागावर पसरलेल्या हिरव्यागार घनदाट वनराईमुळे हा भाग झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो.
झाडीपट्टी रंगभुमीला १०० पेक्षा जास्त वर्षांची समृद्ध अशी परंपरा आहे. १९ व्या शतकाचा शेवट आणि २० व्या शतकाचा प्रारंभ काळ म्हणजे संशोधनाच्या संक्रमणाचा होता. त्यावेळी झाडीपट्टीच्या प्रदेशात दळणवळणाची आणि मनोरंजनाची आजसारखी अतिवेगवान संपर्काची साधने नव्हती. परिणामी येथील नागरिकांना स्वत:च्या अंगभूत कलाकौशल्यातूनच परस्परांचे मनोरंजन करावे लागत असे. झाडीपट्टीतील खेड्यांमध्ये इंग्रज कालखंडात मालगुजार, जमीनदार, पाटील यांनी दंडार, नाट्य आणि संगीत नाटकांना आश्रय दिला. चांगले कलावंत, संगीतकार, वाद्यवृंदवादक यांना हेरून त्यांना बाहेरून आणून जमीन व घरे दिली. दंडार वा संगीत नाटक यांचे आयोजन पैशाचा विचार न करता फक्त मनोरंजन म्हणून केल्या जात असे. दंडारनाट्यात पौराणिक कथांचे प्रतिबिंब तर नाटक प्राचीन धार्मिक, आध्यात्मिक कथानकांवर आधारित असत. झाडीच्या प्रदेशात गावोगावी होळी, दिवाळी, दसरा सणांना वा विशिष्ट दिनी दंडार व नाटकांचे प्रयोग होत असत. परंतु दंडार व नाटक प्रयोग करायचा असल्यास कथानक, कलाकार, नेपथ्थ, सिनसिनेरी, वाद्यवृंदवादक, पार्श्वगायकाची गरज असते. १०० वर्षांपूर्वी हे सर्वजण एकाच वेळेस, एकाच छताखाली उपलब्ध होणे अशक्यप्राय होते. आजच्यासारखी तेव्हा दळणवळण, संपर्क, प्रचार (पत्रके) साधने नव्हती. गावी आलेले पाहुणेमंडळी स्वगावी गेल्यानंतर पाहिलेल्या दंडार वा नाटकांचे आयोजन करीत म्हणजे प्रेक्षकांकडूनच दंडार, नाटक प्रयोगांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रचार व प्रसार होत असे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Shrubtheti now plays a prominent name on the social network!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.