शुक्राचार्य विद्यालयाचे मॉडेल राज्यस्तरावर
By admin | Published: October 20, 2016 12:38 AM2016-10-20T00:38:13+5:302016-10-20T00:38:13+5:30
केंद्र शासनाचा विज्ञान व तत्रज्ञान विभाग नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर..
लाखनी : केंद्र शासनाचा विज्ञान व तत्रज्ञान विभाग नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग जि.प. भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये राज्यस्तरावर निडण्यात आलेल्या १९ मॉडेलमध्ये शुक्राचार्य विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मिरेगाव ता. लाखनीच्या मॉडेलची राज्यस्तरावर निवड करण्यात आली.
शुक्राचार्य विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मिरेगाव लाखनी येथे सत्र २०१६-१७ मध्ये इयत्ता ७ व्या वर्गात शिक्षण घेत असलेली मयक योगराज नंदेश्वर हिने धान शेतीकरीता उपयुक्त जिवाणूखत, हिरवळीचे खत अॅझोला या विषयावर संशोधनात्मक कार्य पुर्ण करून, धान रोवणीचे वेळी अॅझोला नर्सरीमध्ये वाढवून चिखलणीचे वेळी गाडावा किंवा रोवणीनंतर धान रोवणी केलेल्या बांध्यामध्ये शेतीला उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञानाचे मॉडेल जिल्हास्तरीय प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय प्रदर्शनातील १९२ मॉडेलचे परीक्षण करून १९ मॉडेलची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनाकरीता करण्यात आली. त्यामध्ये शुक्राचार्य विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मिरेगाव निर्देशित मॉडेलची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनेक मॉडेलची निवड झालेली होती. मयक नंदेश्वर या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष एम.एल. गजापुरे, प्राचार्य सारंग गजापुरे व इतर शिक्षक व पालक यांनी कौतुक केले. या संशोधनात्मक कार्याकरीता विज्ञान शिक्षक अशोक वाघाये यांचे मार्गदर्शन लाभले. (तालुका प्रतिनिधी)