सिहोरा रुग्णालयात महिला रुग्णांची हेळसांड

By admin | Published: November 9, 2016 12:47 AM2016-11-09T00:47:38+5:302016-11-09T00:47:38+5:30

दर्जेदार वैद्यकीय सेवा आणि सुविधेत चर्चेत असलेल्या सिहोरा येथील ग्रामीण रूग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी अभत्तवी रूग्णाची हेळसांड होत आहे.

Sickness treatment of female patients in Sihora hospital | सिहोरा रुग्णालयात महिला रुग्णांची हेळसांड

सिहोरा रुग्णालयात महिला रुग्णांची हेळसांड

Next

रिक्त पदांचा अनुशेष : महिला वैद्यकीय अधिकारी नाही
चुल्हाड (सिहोरा) : दर्जेदार वैद्यकीय सेवा आणि सुविधेत चर्चेत असलेल्या सिहोरा येथील ग्रामीण रूग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी अभत्तवी रूग्णाची हेळसांड होत आहे. याशिवाय रुग्णालयात रिक्त पदे असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
रूग्णालय परिसरात स्वच्छता, दर्जेदार आरोग्य सेवा आणि सुविधा या करिता चर्चेत असलेल्या सिहोरा येथील ग्रामीण रूग्णालयात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे महिला रूग्णात नाराजीचा सुर आहे. या रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याशिवाय अन्य पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांनी त्रास सहन करावा लागत आहे. रिक्त पदाचे कारण पुढे करित अप्रशिक्षीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची पाळी आली आहे.
रूग्णालयात असणारी साहित्य नादुरूस्त असल्याचा फटका कार्यरत कर्मचाऱ्यांना बसत आहे. या रूग्णालयात अधिक्षकाचे पद रिक्त असल्याने माहिती घेताना अडचणी येत आहे. या पदाचा प्रभार वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे. प्रशासकीय कामकाज आणि वैद्यकीय सेवा आदीची जबाबदारी एकाच अधिकारीकडे असल्याने आरोग्य प्रभावित होत आहे. यासंदर्भात डॉ.अविनाश खुणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. (वार्ताहर)

शवविच्छेदन गृहाचे बेहाल
ग्रामीण रुग्णालयाचे हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. क्षेत्रफळाने विस्तीर्ण असलेल्या या परिसरात ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन गृहाचे बांधकाम करण्यात आले असले तरी आजवर सुविधाअभावी शवविच्छेदन गृह सुरू करण्यात आले नाही. विद्यमान वैद्यकीय अधिकारी यांचाही नकार नसताना जिल्हा प्रशासन ही सुविधा सुरू करण्यासाठी गंभीर नाही.
महिला सुरक्षा रक्षकाचा अभाव
ग्रामीण रुग्णालयात कुटूंब नियोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे महिला रुग्णांना भर्ती करण्यात येत आहे. परंतु महिला रुग्णाची सुरक्षा करणारी यंत्रणाच नाही. महिला सुरक्षा गार्ड नाहीत. याशिवाय पुरूष सुरक्षा रक्षकांचा अभाव असून खानावळ अद्याप सुरू करण्यात आली नाही.

ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णांना सेवा आणि सुरक्षा देताना प्रशासन गंभीर नाही. महिला वैद्यकीय अधिकारी अत्यावश्यक असताना दुर्लक्ष करण्यात येत आहे.
-प्रेरणा तुरकर,
तालुकाध्यक्ष राकाँ तुमसर.
ग्रामीण रुग्णालयात कार्यरत यंत्रणा सामाजिक कार्यकर्त्यांना सहकार्य करित नाही. असभ्य वर्तणुकीमुळे महिला रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. उत्तम वैद्यकीय सेवा असली तरी अंकुश लावण्याची गरज आहे.
-रिता वासनिक, सिहोरा.

Web Title: Sickness treatment of female patients in Sihora hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.