फुटपाथ विक्रेत्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:08 PM2019-06-03T23:08:15+5:302019-06-03T23:08:33+5:30
मतदान यंत्राच्या सुरक्षेच्या कारणावरुन शास्त्री विद्यालय परिसरातील दुकाने हटविण्यात आली होती. त्याठिकाणी विक्रेत्यांनी पुर्ववत दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रशासनाने मज्जाव केला. गोरगरीबांचा व्यवसाय उध्दवस्त झाल्याने शिवसेनेने याबाबत आक्रमक भुमिका घेत नगर परिषद, वीज वितरण कंपनी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. फुटपाथ विक्रेत्यांवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही, अशा इशारा देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मतदान यंत्राच्या सुरक्षेच्या कारणावरुन शास्त्री विद्यालय परिसरातील दुकाने हटविण्यात आली होती. त्याठिकाणी विक्रेत्यांनी पुर्ववत दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रशासनाने मज्जाव केला. गोरगरीबांचा व्यवसाय उध्दवस्त झाल्याने शिवसेनेने याबाबत आक्रमक भुमिका घेत नगर परिषद, वीज वितरण कंपनी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. फुटपाथ विक्रेत्यांवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही, अशा इशारा देण्यात आला.
लोकसभा निवडणुकीतील मतदान यंत्राच्या दृष्टीने शास्त्री विद्यालय परिसरातील दुकाने हटविण्यात आली. ती दुकाने पुर्ववत थाटण्याचा प्रयत्न करण्यात आला असताना त्यांना मनाई करण्यात आली. विक्रेत्यांना देण्यात आलेले वीज मिटरही काढण्याचा प्रकार सुरु झाला. ही माहिती माजी आमदार भोंडेकर यांना मिळताच त्यांनी नगर परिषदेमध्ये धडक दिली. नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांच्याशी चर्चा केली. विक्रेत्यांना तात्काळ कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. अखेर फुटपाथ विक्रेत्यांचे बायोमॅट्रीकद्वारे नोंदणी करुन पर्यायी जागा देण्यास नगर परिषद तयार झाले. त्यानंतर जिल्हा परिषद सीईओंना निवेदन देण्यात आले. त्यांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई स्थगीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच वीज मिटर काढण्याची कारवाई थांबविण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, शिवसेना फुटपाथ सेना जिल्हाध्यक्ष आखीर बेग मिर्झा, जयराम ठोसरे, रमेख धुर्वे, सतिश तुरकर, दिनेश गजभिये, शैलेश खरोले, कृष्णा ठोसरे, मंगेश मुरकुटे, मोहीन शेख, विष्णु कुंभलकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.