राष्ट्रीय महामार्गाकडील साईडपट्ट्या ठरताहेत धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:33+5:302021-06-01T04:26:33+5:30
बॉक्स भंडारा शहरातील महामार्गाची स्थिती धोकादायक भंडारा शहरातून गेलेला महामार्ग हा वाहतुकीसाठी अरुंद ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून या ...
बॉक्स
भंडारा शहरातील महामार्गाची स्थिती धोकादायक
भंडारा शहरातून गेलेला महामार्ग हा वाहतुकीसाठी अरुंद ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्ता रुंदीकरणाची ओरड कायम आहे. मात्र अद्यापही रस्ता रुंदीकरण झालेली नाही. त्यातच रस्त्याकडील साईटपट्ट्या या धोकादायक स्थितीत असून काही ठिकाणी खड्डे पडले आहेत तर अनेक ठिकाणी साईडपट्ट्याच नसल्याने खोल खड्डे पडले आहेत. यासोबतच रस्त्याच्या कडेला विक्रेते बसलेले असतात, यामुळे रस्ता अरुंद ठरत आहे. दुचाकी चालकांनी वाहने चालवायची कशी, जीव गेल्यावर दुरुस्ती करणार काय? रस्त्याची वर्ष-वर्ष दुरुस्ती केली जात नाही. मात्र लाखोंचा टोल वसूल केला जातो, असे यामुळे भंडारा शहरातील नागरिक संतापले आहेत.
बॉक्स
वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले
इतर जिल्ह्यांमध्ये बायपास व उड्डाणपूल निर्मिती झाली आहे. रस्ते चांगले आहेत. मात्र त्या तुलनेत भंडारा शहरात मात्र दुरावस्था असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. आता पावसाळ्यापूर्वी तरी या साईड पट्ट्यांची दुरुस्ती होणार का असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.