अन् पाहता पाहता इसम बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 09:04 PM2018-07-19T21:04:02+5:302018-07-19T21:04:50+5:30
वहिनीच्या निधनामुळे घरात दुख:मय वातावरणात पुन्हा दीराच्या मृत्यूने भेंडारकर परिवाराला हादरुन सोडले. तेरवीच्या दिवशी अस्थिविसर्जनासाठी आलेल्या दीराचा चुलबंद नदीपात्रात डोळ्यांसमक्ष बुडून मृत्यू झाला. रामेश्वर नारायण भेंडारकर (५५) रा.सुकळी असे मृताचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : वहिनीच्या निधनामुळे घरात दुख:मय वातावरणात पुन्हा दीराच्या मृत्यूने भेंडारकर परिवाराला हादरुन सोडले. तेरवीच्या दिवशी अस्थिविसर्जनासाठी आलेल्या दीराचा चुलबंद नदीपात्रात डोळ्यांसमक्ष बुडून मृत्यू झाला. रामेश्वर नारायण भेंडारकर (५५) रा.सुकळी असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
अवघ्या तेरा दिवसापूर्वी रामेश्वर यांची वहिनी शोभा भेंडारकर (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शोभाबाई यांची तेरवी होती. त्यामुळे भेंडारकर कुटुंबीय गुरूवारी अस्थि विसर्जनासाठी कुंभली येथील दुर्गाबाई डोह येथे आले होते. अस्थिविसर्जन झाल्यानंतर सर्वजन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले.
पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीत पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे रामेश्वर यांना पाण्याचा अंदाज आला नाही. अशातच डोळ्यांसमक्ष खोल पाण्यात रामेश्वरचा बुडून करूण अंत झाला.
घटनेची माहिती तात्काळ साकोली पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाली. मासेमारांच्या सहायाने रामेश्वरचे प्रेत नदीबाहेर काढण्यात आले. शवविच्छेनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
तेराव्या दिवशी कुटुंबातील दुसरा मृत्यू
भेंडारकर कुटुंबात तेरा दिवसांपूर्वी शोभाताईचा मृत्यू झाले. तर त्यांच्या तेरवीच्या दिवशीच दीराच्या मृत्यूने भेंडारकर कुटुंबच नाही तर संपूर्ण सुकळीवासीयात शोककळा पसरली आहे.