सिहोऱ्यात शेकडो लिटर दूध ओतले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:17 PM2018-03-18T22:17:01+5:302018-03-18T22:17:01+5:30
दूध शितकरण गृहात तांत्रीक बिघाड आल्याचे कारण देत दुध संघाने रविवारी जिल्ह्यातील दुध खरेदीस नकार दिल्याने शेकडो लिटर दुध रस्त्यावर प्रवाहित करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : दूध शितकरण गृहात तांत्रीक बिघाड आल्याचे कारण देत दुध संघाने रविवारी जिल्ह्यातील दुध खरेदीस नकार दिल्याने शेकडो लिटर दुध रस्त्यावर प्रवाहित करण्यात आले. तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे सदर पशुपालकांनी जिल्हा दुध संघाचा निषेध नोंदविला.
शेतीला पुरक व्यवसाय म्हणून सिहोरा परिसरासह जिल्हयात हजारो शेतकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. दुष्काळी परिस्थितीत हाच व्यवसाय शेतकºयांना आधार देतो. येथील शेतकºयांनी कर्ज घेवून गायी, म्हशी घेतले आहे. यावर्षी धान शेतीने धोका दिला. रब्बी पीकही अवकाळी पावसाच्या फटक्याने होण्याचे नव्हते झाले. अशा स्थितीत शेतकºयांना दुध व्यवसाय आधार देत आहे. यातूनच बहुतांश शेतकरी कुटूंबाचा रथ हाकत आहेत.
यापूर्वी शासनाने दुधाचे भाव कमी केले. यातच पशु खाद्याचे वाढते दर शेकºयांची चिंता वाढविणारे आहे. आणि आता दुध संघानेही शेतकºयांच्या चिंतेत भर घातली आहे. महिना-पंधरा दिवसातून एक-दोन दिवस दुध खरेदी बंद ठेवली जाते. विशेष म्हणजे शेतकºयांना खरेदी बंद असल्याची कोणतीच पुर्व सूचना दिली जात नाही. रविवारलाही असेच झाले.
ग्रामीण भागातील अनेक शेतकºयांनी सिहोरा येथील पाच दुग्ध डेअरी मध्ये सकाळी दुध घेऊ न आले. मात्र दुध डेअरी संचालकांनी वेळेवरच दुध खरेदी बंद असल्याचे सांगितले. यामुळे शेतकरी संतप्त झाले. यावेळी अनेक शेतकºयांनी दुध रस्त्यावर ओतून दिले.
दुध पावडर बनविण्यात येणाºया मशिनीमध्ये बिघाड आल्यामुळे दुग्ध संघाकडे क्षमतेपेक्षा जास्त दूध संकलित झाले होते. सोमवारपासून नियमितपणे दूध संकलन केले जाणार आहे. शेतकºयांच्या हितासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सिहोरा येथे घडलेल्या प्रकाराची माहिती अजुनपर्यंत प्राप्त झालेली नाही.
- करण रामटेके, व्यवस्थापक, जिल्हा दुग्ध संघ, भंडारा.