एकमेव पशुधन तपासणी नाक्याची दुरवस्था
By Admin | Published: July 11, 2016 12:24 AM2016-07-11T00:24:37+5:302016-07-11T00:24:37+5:30
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे असलेल्या एकमेव पशुधन तपासणी नाक्याची दुर्दशा झाली असून या कार्यालयाची व येथील सदनिकेची दुर्दशा झाली आहे.
सदनिकांची दुर्दशा : पावसामुळे कार्यालयीन फाईल ओल्याचिंब
संजय साठवणे साकोली
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे असलेल्या एकमेव पशुधन तपासणी नाक्याची दुर्दशा झाली असून या कार्यालयाची व येथील सदनिकेची दुर्दशा झाली आहे. सन २००५ पासुन या तपासणी नाक्याच्या दुरुस्तीची करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
या मागणीकडे दुर्लक्ष असल्याने या कार्यालयातील संपुर्ण फाईल पावसामुळे खराब झाल्या आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागझीरा रोड साकोली येथे पशुधन तपासणी नाका आहे. भंडारा जिल्ह्यातील हा एकमेव तपासणी नाका आहे.
यात बैलवर्ग व म्हैसवर्ग यांची बुळकांडी या रोगाची तपासणी करुन दुसऱ्या राज्यात जनावरे नेण्यासंबंधी प्रमाणपत्र दिले जातात. या कार्यालयात पशुधन विकास अधिकारी श्रेणी १, पशुधन पर्यवेक्षक २ पदे व परिचर दोन पदे अशी एकुण पाच पदे मंजुर असून यासाठी एक कार्यालय व सदनिका तयार करण्यात आल्या आहेत.
परंतु देखभाल दुरुस्तीअभावी हे कार्यालय व सदनिका जीर्णावस्थेत आले आहेत.
या कार्यालयाची व सदनिकांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी या कार्यालयातर्फे २००५-२००६ पासुन सन २०१६ पर्यंत दरवर्षी पाठपुरावा करीत आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कार्यालयाची व सहनिकेची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी कार्यालयीन फाईल्स ओल्याचिंब झाल्या आहेत.