सिंगल फेज योजना फसवी
By admin | Published: February 7, 2015 12:21 AM2015-02-07T00:21:50+5:302015-02-07T00:21:50+5:30
येथे मागील ७ वर्षापुर्वी विद्युत वितरण कंपनीने सिंगलफेज योजना अंमलात आणली. सुरवातील ही योजना खुप फायद्याची व चांगली असल्याचे...
दिघोरी (मोठी) : येथे मागील ७ वर्षापुर्वी विद्युत वितरण कंपनीने सिंगलफेज योजना अंमलात आणली. सुरवातील ही योजना खुप फायद्याची व चांगली असल्याचे विज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात ही योजना फसवी असल्याचा प्रत्यक्ष दिघोरीतील शेतकरी व लघुउद्योजकांना आला आहे.
सिंगलफेज योजनेमध्ये फक्त ८ तास थ्रिफेज विद्युत पुरवठा केला जात असल्याने अन्न पिकविणाऱ्या शेतकऱ्यावंर खुप मोठे संकट ओढवले आहे. फक्त ८ तास विज पुरवठा मिळत असल्याने पिकांना सलग व एकसमान पाणी देणे शक्य होत नाही. तसेच या योजनेत विजेचा पुरवठा हा दोन टप्प्यामध्ये होत असतो. पहिल्या टप्प्यात रवीवार ते बुधवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत थ्रिफेज विद्युत पुरवठा होतो. तर दुसरा टप्प्यांत गुरूवार रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खुपच त्रास सहन करावा लागतो. रात्री १२ वाजता शेतात जावून मोटारपंप सुरू करावे लागत असल्याने येथील अनेक शेतकऱ्यांना साप व विंचू याविषयी प्राण्यांची दंश केला असल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाची बाब अशी की यामध्ये कुणाही शेतकऱ्याचा जीव गेला नाही. जर एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेला नाही. जर एखाद्या शेतकऱ्यांचा जीव गेला तर याला जबाबदार विज वितरण कंपनीला का धरण्यात येवू नये, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. कारण भाजीपाला पिकाला तुट पाणी द्यावे लागते म्हणजेच पाईपचे जोड काढून काढून पाणी द्यावे लागत असल्याने रात्रीच्या अंधारात हे शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड करणेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थि परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे.
सिंगलफेज योजनेमुळे शेतकऱ्यांसारखीच बिकट अवस्था लघुउद्योजकांची झाली आहे. लघुउद्योजकांना सुद्धा ८ तासच थ्रीफेज विद्युत पुरवठा मिळतो. शिवाय रात्री १२ वाजता सुरू होणाऱ्या थ्रीफेज पुरवण्यामुळे रात्रीला काम कसे करावे, असा गंभीर प्रश्न लघुउद्योजकांना पडला आहे. लघुउद्योजकामध्ये राईस मिल, आईल मिल, आटाचक्की, बेल्डींग दुकान इत्यादी मोडत असून हे उद्योग मजुरांवर पुर्णत: अवलंबून आहेत व रात्रपाळीत काम करायला येथील मजूर तयार नसतात. त्यामुळे लघुउद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. (वार्ताहर)