सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:08 PM2019-03-02T22:08:59+5:302019-03-02T22:09:21+5:30

रेती माफिया वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर ट्रक चालवायला घाबरत नाही. घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले जावे. जोखीम पत्करु नका. कुटूबाची काळजी घ्या. सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात, असे भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी सांगितले.

Sinham-e-jurists do not survive | सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात

सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात

Next
ठळक मुद्देमोहाडी येथे संवाद सभा : रिना जनबंधू यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : रेती माफिया वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर ट्रक चालवायला घाबरत नाही. घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले जावे. जोखीम पत्करु नका. कुटूबाची काळजी घ्या. सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात, असे भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी सांगितले.
पोलीस ठाणे मोहाडी येथे सरपंच, पोलीस पाटील, दक्षता समिती सदस्यांची संवाद सभा घेण्यात आली. त्या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी मोहाडी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, पोलीस उपनिरीक्षक गभणे यांची उपस्थिती होती. रेती चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस पाटलांच्या नियुक्त्या करु नयेत असा प्रश्न सभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना रिना जनबंधू यांनी रेती माफियांची दहशत असल्याचे अप्रत्यक्ष सुचविले. त्यासाठी आपले जीव धोक्यात घालू नका असा सल्ला दिला. रेती माफियांचा कसा बंदोबस्त करायचा ते आम्ही बघून घेवू. सरपंचांनी गावाच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय शोधला पाहिजे. रेती ‘चोरी’ होते असा संदर्भ देवून तक्रार करा. रेतीशिवाय अन्य अवैध व्यवसाय गावात, परिसरात होत असतील. त्याची खबर दया त्याची तात्काळ दखल घेवू. अलीकडे मुली पळून जाण्याचे प्रकार वाढलेत. त्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्या. एखादी घटना आटोक्याबाहेरची असेल, गुन्हा घडण्याची शक्यता असल्यास तात्काळ पोलीस स्टश्ोनला खबर दिली जावी, कोणत्याही घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले पाहिजे. गावातील लहान गुन्हे पंचाच्या, तंटामुक्त समितीच्या माध्यमाने सोडवा. दोन गटात, व्यक्तीत तणाव होत असेल तर समन्वय करा, असा विश्वास त्यांनी संवाद सभेत दिला. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी, महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांच्या मदतीने वाद मिटविण्यास मदत होत असते. सहकार्य करुन पोलीस व जनतेचे नाते दृढ करा, असे सांगितले.
यावेळी संवाद सभेत पोलीस अपविभागीय अधिकारी रिना जनबंधू यांनी सर्व उपस्थितांची ओळख करुन घेतली. गावात काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले तसेच अडचणी व समस्यांची माहिती घेतली. यावेळी संवाद सभेला सरपंच, पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्या व पत्रकार उपस्थित होते.
रेती चोरी रोखणार
रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यावर प्रशासन आळा घालण्यात अपयशी ठरला आहे. राजकिय प्रभावाने रेती माफिया बिनधास्त व्यवसाय करीत आहेत. अशा विपरित परिस्थितीत आचारसंहिता नंतर रेती माफियांचे मुसके कसे बांधायचे याचा विचार पोलीस प्रशासन करणार आहे, असे रोखठोक उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू म्हणाल्या.

Web Title: Sinham-e-jurists do not survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.