साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:08 AM2019-05-12T01:08:27+5:302019-05-12T01:09:13+5:30
ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात.
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : ऐरवी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की, लहान मुलांचे पालक पाल्यांना नव्याने उदयास आलेल्या समर कॅम्प, संस्कार शिबिरे नाही तर कोणत्याही क्लासला तरी पाठवताना दिसतात. परंतु ज्यांच्या पालकांकडे मोठी रकम भरायला नाही अशा पालकांचे पाल्य रोजीसाठी भटकतात. खेळण्या बाळगण्याच्या वयात ही निरागस बालके, साहेब, व्यवसाय करणे गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करीत आहेत.
भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर ज्या ज्या जंगल भागात रानमेवा उपलब्ध होतो. अशा परिसरात सुटीच्या दिवसात लहान मुले एकही रुपयाची लागत न लावता मेहनतीने पाच रुपये, दहा रुपये कमावताना दिसतात. यामुळे पालक तथा पाल्य दोन्ही चेहऱ्यावर बºयाचदा आनंद दिसतो. पण यात त्यांचे बालपण हरवित असते.
एखाद्या सुशिक्षित, सुटा बुटातल्या गृहस्थाने, ग्राहकाने या विषयावर प्रश्न केला तर उत्तर एकच असते तो म्हणजे व्यवसाय करणे गुन्हा आहे का साहेब? बºयाच ठिकाणी लहान चिमुकले मुल पायात चप्पल नाही, अंगावर स्वच्छ कपडे नाहीत अशा स्थितीत रस्त्याच्या कडेला व्यवसाय करताना आढळतात. कुणी चिचबिलाई, चार, पत्रावळी तर कुणी फळाने आंबे विकत असल्याचे दिसून येते. आरोग्याबबतही जागरूकता असत नाही. अशात त्यांना आजाराने ग्रासले याचा भूर्दंडही सहन करावा लागत असतो.
आजही समाजात, वडिलांनी कमावले अन् मुलाने गमावले, अशी बरीच उदाहरण आहेत. मुलाला लाखो रुपये खर्च करून एखादी लहान मोठा व्यवसाय लावून दिला तरी तो वाममार्गाचा आहारी जातो. परिणामी समाजात असलेली पत व प्रतिष्ठा ही लयास जाते.
अशा पालकांनी करायचे तरी काय? असा सवाल आहे. जिल्ह्यात तथा देशभरात बाल कामगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आज एखाद्या गरीब घरच्या मुलाला सुरु असलेल्या शिबिरात काहीतरी नवीन शिक्षण आत्मसात करण्याची आवडही असली तरी तो तिथे पैसा व आर्थिक परिस्थितीमुळे जाऊ शकत नाही.अशा मुलांना शिबिरात मोफत शिक्षणही मिळाले तरी सुद्धा कुठे ना कुठे तरी लहान मोठ्या रकमेत पैसा लागणार, या विवंचनेत ते जात नाहीत.
कदाचित या भावनेमुळे तर लहान मुले बालकामगार होत नसणार? ज्याला दात आहे त्याकडे चणे नाहीत आणि ज्याकडे चणे आहेत त्याकडे दात नाही. असेही बºयाचदा समाजात, घरादारात मुलांविषयी चर्चा होताना ठिकठिकाणी ऐकायला मिळते. यामध्ये दोष कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही, हे येथे उल्लेखनीय.