साहेब ! उत्पन्नाचे दाखले केव्हा मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:56+5:302021-09-02T05:16:56+5:30
बारव्हा : शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कागदपत्रांसह जोडाव्या लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पालकांना तहसील कार्यालयाची भटकंती करावी लागत आहे. ...
बारव्हा : शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कागदपत्रांसह जोडाव्या लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पालकांना तहसील कार्यालयाची भटकंती करावी लागत आहे. पंधरा ते तीस दिवस उत्पन्नाचे दाखले ऑनलाईन ऑफलाईन्स कॉम्प्युटरमधून जागाच सोडत नसल्याने नॉन-क्रिमीलेअर दाखल्यासाठी महिना लोटूनही पालकांना पाल्यासाठी अर्ज करताना तारेवरची कसरत करीत रोजच सेतू केंद्रावर ‘हॅलो, दाखला आला का?’ म्हणण्याची वेळ आली आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रांत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमीलेअर सर्टिफिकेटसाठी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. या दाखल्यासाठी तालुक्यातील अनेक सेतू केंद्रांमधून लाभार्थ्यांनी हजारोंच्या घरात ऑनलाईन अर्ज केले. मात्र ‘ज्याने दिले शंभर त्याचा लागला नंबर’ असा भोंगळ कारभार सध्या लाखांदूर तहसील कार्यालयात सुरू असल्याने पंधरा ते वीस दिवस लोटूनही उत्पन्नाचे दाखले पैसे न देणाऱ्या लाभार्थ्यांना मिळत नसल्याची ओरड आहे. सेतू केंद्रावर चौकशी केली तर कुणी म्हणतो सर्व्हर काम करीत नाही, तर तहसीलदाराचे थम्ब लागणारी मशीन नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात संबंधित नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता तहसील कार्यालयात कार्यरत लिपिक रमण यांच्याशी संपर्क साधा, असे टोलवाटोलवीचे उत्तर देण्यात आले.