वैनगंगा नदीतील बेटावर सहा मासेमार अडकले, पवनी तालुक्यातील पाथरी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 09:40 PM2022-07-18T21:40:29+5:302022-07-18T21:41:55+5:30
या बेटावर मासेमार अडकून पडल्याची माहिती गावकऱ्यांनी प्रशासनाला दिली. त्यांना बाहेर काढण्यासाठी सायंकाळी ७ वाजता जिल्हा शोध व बचाव पथक दाखल झाले.
- ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : मासेमारी करण्यासाठी गेलेले सहा मासेमार वैनगंगा नदी पात्रातील बेटावर अडकल्याची घटना सोमवारी सायंकाळी पवनी तालुक्यातील पाथरी येथे उघडकीस आली. त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथक प्रयत्न करीत आहे.
पवनी तालुक्यातील पाथरी येथील काही मासेमार सोमवारी गावाजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत मासेमारी करीता गेले होते. मात्र सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक पाणी पतळीत वाढ झाल्याने त्यांनी नदीपात्रात असलेल्या बेटाचा आधार घेतला.
या बेटावर मासेमार अडकून पडल्याची माहिती गावकऱ्यांनी प्रशासनाला दिली. त्यांना बाहेर काढण्यासाठी सायंकाळी ७ वाजता जिल्हा शोध व बचाव पथक दाखल झाले. मात्र तोपर्यंत अंधार झाला. तसेच वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी वाढत असल्याने बचाव कार्यात अडसर निर्माण झाला. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला पाचरण करण्यात आले आहे.
वृत्तलिहिस्तोवर सहाही मासेमार बेटावर अडकून असून तेथे वैनगंगा नदीच्या तीरावर अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, पवनीच्या तहसील निलिमा रंगारी तळ ठोकून आहेत.