मोहाडी तहसीलदारांना सहा तास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:09 PM2019-06-03T23:09:50+5:302019-06-03T23:10:11+5:30

आबादी प्लॉटमधील घर महसूल प्रशासनाने जमीनदोस्त केल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील सिरसोली येथील गावकऱ्यांनी तहसीलदारांना सोमवारी तब्बल सहा तास घेराव घातला. सुमारे २०० ते ३०० महिला व पुरूष या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महिलांना तहसीलदारांच्या नावाने बांगड्या फोडून निषेध व्यक्त केला. अखेर सायंकाळी ६ वाजता या प्रकरणावर तोडगा निघाला.

Six hours of gherao for Mohadi tehsildars | मोहाडी तहसीलदारांना सहा तास घेराव

मोहाडी तहसीलदारांना सहा तास घेराव

Next
ठळक मुद्देसिरसोलीचे नागरिक : अतिक्रमित घराचे प्रकरण, महिलांनी केला बांगड्यांचा अहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : आबादी प्लॉटमधील घर महसूल प्रशासनाने जमीनदोस्त केल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील सिरसोली येथील गावकऱ्यांनी तहसीलदारांना सोमवारी तब्बल सहा तास घेराव घातला. सुमारे २०० ते ३०० महिला व पुरूष या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महिलांना तहसीलदारांच्या नावाने बांगड्या फोडून निषेध व्यक्त केला. अखेर सायंकाळी ६ वाजता या प्रकरणावर तोडगा निघाला.
सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे आबादी प्लॉटवरील राहते पक्के घर नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या आदेशाने जमीनदोस्त करण्यात आले होते. याप्रकारामुळे सिरसोली गावात महसूल विभागाविरूद्ध प्रचंड असंतोष पसरला होता. या प्रकरणाचा रोष व्यक्त करण्यासाठी सिरसोली येथील शेकडो महिला व पुरूष सोमवारी सकाळी येथील तहसील परिसरात जमा झाले. त्यानंतर सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास महिला व पुरूषांनी तहसीलदारांच्या कक्षाचा ताबा घेतला. तहसीलदार धनंजय देशमुख यांना घेराव घातला. चुकीचे पत्र देणाºया नायब तहसीलदार कातकडे यांना त्वरीत निलंबित करा, घराच्या नुकसानीची रक्कम तात्काळ द्या, बेघर झालेल्या लिल्हारे परिवाराला निवासाची सोय करा आदी मागण्या नागरिक करीत होते. तहसीलदार धनंजय देशमुख केवळ बघ्याची भूमीका घेत होते. ते काही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी खुर्च्या व अन्य साहित्य तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ तहसीलदार निशब्द बसून होते.
यावेळी लोकांचा रोष बघून नायब तहसीलदार कातकडे यांनी बाहेरचा रस्ता धरला. सुमारे सहा तास आंदोलनकर्ते बेघर भावांनी मांडलेल्या उपोषण मंडळपात तर कधी तहसीलदारांच्या कक्षात बसून वाटाकाटी करीत होते.
दरम्यान तुमसरचे एसडीओ मुकुंद तोंडगावकर मोहाडी तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यांच्याविरूद्धही संताप व्यक्त केला जात होता. यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, किसान नेते माधवराव बांते, राष्ट्रवादीचे नेते राजू कारेमोरे, काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोेरे, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, किरण अतकरी, केशव बांते, प्रमोद तितीरमारे, विजय शहारे, सदाशिव ढेंगे, रमेश पारधी, समील पठान, शंकर मोहारे आदींनी प्रयत्न केले.
तब्बल तीन तास चर्चा होवूनही एसडीओ व तहसीलदार निर्णय घेण्यात असमर्थ असल्याचे दिसत होते. परिस्थितीती हाताबाहेर जाण्याचे चिन्ह दिसत असल्याने मोहाडी, आंधळगाव, वरठी येथून पोलिसांची कुमक पाचारण करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे, एपीआय बंडू बानबले, पीएसआय विवेक राऊत, सुरेश बुंदे आदी उपस्थित होते.
यावेळी महिलांनी रोष व्यक्त करीत आपल्या हातातील बांगड्या फोडून तहसीलदारांना अहीर केला. तर काही काळ तहसीलदार कक्षातून निघून गेल्याने त्यांना बोलवा, अशी मागणी होवू लागली. सुमारे एक तासानंतर तहसीलदार हजर झाले. अखेर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास या प्रकरणात यशस्वी वाटाघाटी झाल्या. तसेच तहसीलसमोर असलेले लिल्लारे बंधूचे उपोषणही मागे घेण्यात आले.
काँग्रेस नेता झाला शासकीय वाहनाचा सारथी
सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे दोन मुले व काका उपोषणावर बसले होते. शिवलाल रुग्णालयात दाखल होते. त्यांनाही सोमवारी उपोषणस्थळी आणण्यात आले. उपोषण सुटल्यानंतर शासकीय वाहनाने त्यांना सिरसोली येथे सोडून देण्याचे ठरविले. परंतु तहसील कार्यालयाकडे चालकच उपलब्ध नव्हता. त्यामुळे उपोषणकर्त्यांना सिरसोली येथे सोडून देण्यासाठी काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे शासकीय वाहनाचे सारथी झाले. लिल्हारे परिवाराला त्यांनी सिरसोली येथे सोडून दिले. यावेळी तहसीलदार धनंजय देशमुखही वाहनात बसले होते.

Web Title: Six hours of gherao for Mohadi tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.