तीन पदांसाठी सहा नामांकन

By admin | Published: November 27, 2015 12:47 AM2015-11-27T00:47:19+5:302015-11-27T00:47:19+5:30

जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व मोहाडी नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून नगराध्यक्षपदासाठी ३० नोव्हेंबरला निवडणूक होत आहे.

Six nominations for three positions | तीन पदांसाठी सहा नामांकन

तीन पदांसाठी सहा नामांकन

Next

नगराध्यक्षपदाची निवडणूक ३० रोजी : सदस्य तीर्थस्थळीच
भंडारा : जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व मोहाडी नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून नगराध्यक्षपदासाठी ३० नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी नामांकन दाखल करण्यात आले. यात लाखनी येथून तीन, लाखांदूर दोन तर मोहाडी येथे एकाच उमेदवारांने नामांकन दाखल केले आहे.
लाखनी : १७ सदस्यीय लाखनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी आज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.काँग्रेसतर्फे कल्पना भिवगडे यांनी नामांकन दाखल केले. त्यांचे सुचक अनुमोदक धनंजय तिरपुडे व अनिल निर्वाण आहेत. भाजपातर्फे ज्योति निखाडे यांनी अर्ज दाखल केला. त्यांचे सुचक अनुमोदक महेश आकरे व माया निंबेकर आहेत. लाखनी विकास मंच आघाडीतर्फे अपक्ष उमेदवार सुशिला भिवगडे यांनी अर्ज दाखल केले. त्यांचे सुचक व अनुमोदक विक्रम शेंडे व साधना वंजारी आहेत. लाखनी नगरपंचायतचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता राखीव आहे.
लांखादूर : नगराध्यक्ष पदाकरिता भाजपा उमेदवार निलम विलास हुमणे तर काँग्रेसकडून निलीमा सतीश टेंभुर्णे यांना अर्ज निवडणूक अधिकारी जी. जी. जोशी यांचेकडे नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार विजय पवार उपस्थित होते.
१७ प्रभाग असलेल्या नगरपंचायतमध्ये भाजपा ११, काँग्रेस ५, राष्ट्रवादी १ तर असे उमेदवार निवडुन आले होते. ३० नोव्हेंबरला अध्यक्ष पदाची व उपाध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.
मोहाडी : १७ सदस्यीय मोहाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वाती निमजे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. भाजपच्या वतीने मनीषा साठवणे या नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता पाच मिनीट उशिरा पोहचल्याने त्यांचा अर्ज स्विकारण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या स्वाती निमजे यांचा एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्याकडे प्राप्त झाला असून त्यांच्या विजयांची औपचारिकता शिल्लक आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Six nominations for three positions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.