साकोली ठाण्यात पाच वर्षात सहा ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:10 PM2019-02-27T22:10:21+5:302019-02-27T22:10:42+5:30

गत पाच वर्षात येथील ठाण्याला तब्बल सहा ठाणेदार लाभले. शासनाच्या नियमानुसार पोलीस अधिकाऱ्याचा पाच वर्षाचा कार्यकाळ असतो. परंतु साकोली येथील ठाणेदाराची दीड ते दोन वर्षातच बदली होत असल्याचा अनुभव आहे.

Six Thanedars in Sakoli Thane in five years | साकोली ठाण्यात पाच वर्षात सहा ठाणेदार

साकोली ठाण्यात पाच वर्षात सहा ठाणेदार

googlenewsNext
ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था : दीड ते दोन वर्षात होते ठाणेदारांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : गत पाच वर्षात येथील ठाण्याला तब्बल सहा ठाणेदार लाभले. शासनाच्या नियमानुसार पोलीस अधिकाऱ्याचा पाच वर्षाचा कार्यकाळ असतो. परंतु साकोली येथील ठाणेदाराची दीड ते दोन वर्षातच बदली होत असल्याचा अनुभव आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. साकोली ठाणेदाराचा गत इतिहास बघता बदल्यांबाबत वेगळी स्थिती दिसून येते. २००९ मध्ये ठाणेदार पुरुषोत्तम बाडेवाले रूजू झाले. फक्त त्यांनीच चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून साकोली पोलीस ठाण्याचा कारभार सुरळीत चालविला. २०१३ मध्ये त्यांचे स्थानांतरण झाले. त्यानंतर २०१३ ला ठाणेदार भगवान घारतोडे रूजू झाले. त्यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर स्थानांतरण झाले. २०१६ ला सुरेशकुमार धुसर रूजू झाले. अवघ्या एका वर्षातच भंडारा येथे स्थानांतरण करण्यात आले. यानंतर एप्रिल २०१६ ला गोकुळ राऊत ठाणेदार म्हणून रूजू झाले. परंतु अवघ्या चार महिन्यातच जुलै मध्ये त्यांचे स्थानांतरण करण्यात आले. यानंतर जगदीश गायकवाड रूजू झाले. त्यांची बदली २०१७ ला झाली. त्यानंतर रामेश्वर पिपरेवार रूजू झाले. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भंडारा येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर बंडोपंत बनसोडे रूजू झाले. त्यामुळे ते किती दिवस राहतात याकडे लक्ष आहे.
तीन पोलीस चौकी
साकोली पोलीस ठाणे अंतर्गत सानगडी, गोंडउमरी व एकोडी अशा तीन पोलीस चौकी असून दोन पोलीस चौकीवर पोलिसच राहत नसल्याचे दिसते.

Web Title: Six Thanedars in Sakoli Thane in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.