कर्तृत्वातून देतेय मुलींच्या जीवनाला आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:45 PM2018-03-07T23:45:43+5:302018-03-07T23:45:43+5:30

घरची स्थिती बेताचीच. मुक्त विद्यापिठातून बारावीची परिक्षा पास केली. लग्नासाठी स्थळ आल्यावर जीवनाच्या उंबरठ्यावर नवीन वाटचाल सुरू झाली. संसाररूपी वेलीवर तीन फुलेही उमलली.

Size of the life of the girls giving up the role | कर्तृत्वातून देतेय मुलींच्या जीवनाला आकार

कर्तृत्वातून देतेय मुलींच्या जीवनाला आकार

googlenewsNext
ठळक मुद्देआज जागतिक महिला दिन : महिलांसमोर ठरली ती प्रेरणादायी

आॅनलाईन लोकमत
भंडारा : घरची स्थिती बेताचीच. मुक्त विद्यापिठातून बारावीची परिक्षा पास केली. लग्नासाठी स्थळ आल्यावर जीवनाच्या उंबरठ्यावर नवीन वाटचाल सुरू झाली. संसाररूपी वेलीवर तीन फुलेही उमलली. परंतू आर्थिक स्थिती हलाखीची. कधी गवत कापून तर कधी धुणी भांडी करून जीवनाचा गाडा खेचला. दोन दशकांचा कालावधी लोटल्यावर कर्तृत्वाच्या बळावर ती मुलींच्या जीवनाला आकार देत आहे.
सुशिला गणेश बडवाईक (४३़) असे या कर्तृत्ववान महिलेचे नाव असून आज जागतिक महिला दिनी तिच्या संघर्षाची ही छोटेखानी कहाणी. सुशिला यांचा जन्म लाखनी तालुक्यातील निलागोंदी येथे झाला.
आई-वडील व एक भाऊ असा कुटुंब. ग्रामीण क्षेत्र असल्याने शिक्षणासाठी फरफट कायमच. अशा स्थितीतही दहावीची परीक्षा दिली. दहावीत अनुर्तीर्ण झाली. मात्र अपयशाला न डगमगता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून बारावीची परीक्षा उर्तीर्ण केली. २० वयोवर्ष असताना भंडारा येथील गणेश बडवाईक यांच्याशी विवाह झाला.
गरिबीत संसाराचा गाडा चालवित असताना तीन अपत्येही जन्माला आली. तीन्ही अपत्य मुली. गणेश बडवाईक रिक्षा चालवितात. कुटुंबाचा गाडा खेचण्यासाठी सुशिला यांनी कंबर कसली. मुलीच आपल्या स्वप्नांना पूर्ण करतील या उद्देशाने सुशिलाने मिळेल ते काम करायला सुरूवात केली. गवत कापणी ते चार घरी धुणी-भांडी करून संसाराचा गाडा खेचला. लग्नानंतर बरीच वर्षे किरायाच्या घरात वास्तव्य केले. दर महिन्याला थोडीफार रक्कम गोळा करून स्वत:चे घर व्हावे हे स्वप्नही त्यांंनी पूर्ण केले.
मेहनतीने ओळख निर्माण केली. मागील १४ वर्षांपासून भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात सुशिला ह्या शालेय पोषण आहार शिजविण्याचे कार्य करीत आहेत. यासह मोलमजुरीचे कामही त्या करीत आहेत. कुठल्याही स्थितीत मुलींचे ुशिक्षण थांबता कामा नये. एक महिला म्हणून मी जसा संघर्ष केला, तसा संघर्ष माझ्या मुलींच्या वाटेला येऊ नये, यासाठी त्या अहोरात्र मेहनत घेत आहेत.
सुशिला यांची मोठी मुलगी परिचारिकेचे प्रशिक्षण घेत असून दुसरी व तिसरी मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. जीवनाच्या वळणावर हद्ययातील मार्मिक कप्प्यात अंतकरण जड झाल्यास मुलींसोबत मनमोकळी चर्चा करून अश्रूंना वाट मोकळी करून देते, असेही त्या सांगायला विसरल्या नाहीत.

Web Title: Size of the life of the girls giving up the role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.